Cricket Buzz»फोटो गॅलरी »विराट कन्या वामिका व डिव्हिलयर्सची मुलगी येंते यांचा फोटो व्हायरल, अनुष्का शर्मानं दिली रिअॅक्शनविराट कन्या वामिका व डिव्हिलयर्सची मुलगी येंते यांचा फोटो व्हायरल, अनुष्का शर्मानं दिली रिअॅक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 1:11 PMOpen in App1 / 6भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी 11 जानेवारी 2021ला नन्ही परी अवतरली. ही दोघं आई-बाबा बनले आणि त्यांनी मुलीचं नाव वामिका असं ठेवलं. विराट-अनुष्काच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी अजुनही त्यांचे चाहते आतुर आहेत. या दोघांनी मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Danielle de Villiers/Instagram)2 / 6इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या पर्वात एबी डिव्हिलियर्सची पत्नी डॅनिएलने मुलगी येंतेसह आणखी एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. येंते तिच्या पहिल्या मैत्रीणीची गळाभेट घेत आहे. या फोटोवर अनुष्का शर्मानेही इमोजीने प्रतिक्रिया दिली आहे. डोक्यावर पिंक रिबीन असलेली मुलगी ही विराट-अनुष्का यांची असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. (Danielle de Villiers/Instagram)3 / 6डॅनिएलनं नुकतंच अनुष्कासोबत एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यात दोघीही त्यांच्या मुलींसोबत दिसल्या. (Danielle de Villiers/Instagram)4 / 6भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) लंडन दौऱ्याची तयारी करत आहे. रविवारी त्यानं इंस्टाग्रामवर प्रश्नोत्तराचा वर्ग भरवला अन् चाहत्यांनी विचारलेल्य प्रश्नांची उत्तरे दिली. या सेशनमध्ये काही चाहत्यांनी विराटला त्याच्या मुलीबद्दल विचारले. वामिका असे नाव ठेवण्यामागचा अर्थही अनेकांनी विचारला. एका चाहत्यानं वामिकाचा फोटो पोस्ट करण्याची विनंती केली, परंतु टीम इंडियाचा कर्णधारानं त्यावर भन्नाट उत्तर दिलं. 5 / 6 विराटनं वामिकाचा अर्थ सांगितला. तो म्हणाला,''देवी दुर्गाचं दुसरं नाव वामिका असं आहे. जोपर्यंत वामिकाला सोशल मीडिया म्हणजे काय हे कळत नाही आणि ती स्वतः त्याचा वापर सुरू करत नाही, तोपर्यंत तिचा फोटो पोस्ट न करण्याचा निर्णय मी आणि अनुष्कानं घेतला आहे.'' 6 / 6जानेवारी २०२१मध्ये विराट-अनुष्काच्या घरी नन्ही परी आली. त्यावेळी विराट व अनुष्कानं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कृपया दखल देऊ नका, असे आवाहन केलं होतं. या दोघांनी एकत्रितरित्या एक पोस्ट लिहिली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications