Join us  

विराट कोहली अन् निवड समितीत होता वाद?; शिखर धवनच्या निवडीवरून उडाले खटके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 2:13 PM

Open in App
1 / 5

विराट कोहलीनं वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली अन् त्याचे चाहते चक्रावले. विराटच्या निर्णयानं त्याचे चाहते चक्रावले. पण, या निर्णयामागे अनेक घटक कारणीभूत होते आणि आता ते हळुहळू समोर येत आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर ( WTC Final) विराटच्या नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

2 / 5

Cricbuzz नं दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर टॉप लेव्हलवर बदलाबाबत चर्चा झाली. फलंदाज म्हणून पुन्हा फॉर्मात परतण्यासाठी विराटनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानं अशात अप्रत्यक्षपणे, त्याच्यावरील अतिरिक्त दबावाबाबत सांगितले होते.''

3 / 5

याच वृत्तात असे म्हटले की, विराटला नवीन निवड समितीसोबत काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. उदाहरण द्यायचे झाल्यास, या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी विराटनं शिखर धवनसाठी आग्रह धरला होता. निवड समितील दुसऱ्या सलामीवीराला संधी देण्याच्या पक्षात होते, ज्यानं विजय हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी केली होती. पण, धवनसाठी टीम इंडियाचा कर्णधार भांडला होता.

4 / 5

ही दुसरी गोष्ट आहे की श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनला त्यांना कर्णधार म्हणून नेमावे लागले. त्या बैठकीत एवढी खडाजंगी झाली होती की, बीसीसीआयला संघ जाहीर करण्यापूर्वी सर्वांच्या ( Virat Kohli insisted selectors to pick Shikhar Dhawan for the ODIs against England earlier this year. Selectors wanted to have another opener who did well in the Vijay Hazare Trophy. Kohli argued Dhawan is must. )

5 / 5

विराट कोहलीला आयसीसी स्पर्धांमध्ये यश मिळवता आलेले नाही. २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९चा वन डे वर्ल्ड कप आणि २०२१ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल, यात टीम इंडियाला जेतेपद पटकावता आलेले नाही. बीसीसीआय उघडपणे विराटच्या अपयशावर नाराजी व्यक्त करत नसले, तरी त्यांनी आपापसात याबाबत चर्चा केली होती.

टॅग्स :विराट कोहलीशिखर धवनबीसीसीआय
Open in App