IPL मध्ये विराट 50 वेळा 50+, 223 षटकार अन् पोलार्डच्या कॅम्पमध्ये एन्ट्री; गेललाही टाकलं मागं

virat kohli ipl records list : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने काल मुंबई इंडियन्सला (MI vs RCB) पराभूत करून आयपीएल २०२३ मध्ये विजयी सलामी दिली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने काल मुंबई इंडियन्सला (MI vs RCB) पराभूत करून आयपीएल २०२३ मध्ये विजयी सलामी दिली. काल आयपीएलचा पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला.

आरसीबीकडून संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर विराट कोहलीने ८२ धावांची नाबाद खेळी केली. फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पहिल्या बळीसाठी १४८ धावांची भागीदारी नोंदवली.

कालच्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावताच एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. तो आयपीएलमध्ये ५० वेळा ५० हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर या यादीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. त्याने ६० वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. विराटने आयपीएलमध्ये एकूण ४५ अर्धशतके झळकावली आहेत.

तसेच किंग कोहलीच्या नावावर ५ शतकांची देखील नोंद आहे. त्यामुळे तो ५० वेळा ५० हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. या यादीत किंग कोहलीने कायरन पोलार्डची बरोबरी साधली आहे. दोघांनी आयपीएलमध्ये एकूण २२३ षटकार ठोकले आहेत.

तर ३५७ षटकार ठोकून ख्रिस गेल अव्वल स्थानी कायम आहे. या यादीत पोलार्ड आणि कोहली दोघेही पाचव्या क्रमांकावर आहेत.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने २२४ आयपीएल सामन्यांमध्ये ६७०६ धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. मुंबईला १७१ धावांवर रोखल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने अप्रतिम कामगिरी करून विजय साकारला. विराटने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला.

तर कर्णधार डू प्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर आरसीबीने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी आणि २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.