Cricket Buzz»फोटो गॅलरी »विराट कोहली 2019 मोडणार सचिन तेंडुलकरचे 'हे' विक्रम!विराट कोहली 2019 मोडणार सचिन तेंडुलकरचे 'हे' विक्रम! By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 3:39 PMOpen in App1 / 5ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा तो पहिलाच आशियाई कर्णधार ठरला. त्यामुळे 2019 मध्ये कोहली आणखी कोणकोणते विक्रम मोडतो, याची उत्सुकता लागली आहे. कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यात नेहमी तुलना होत आली आहे. त्यामुळे या वर्षातही ती सुरुच राहील. 2019 मध्येही कोहलीला क्रिकेटच्या देवाची अनेक विक्रम खुणावत आहेत...2 / 5सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत आणि त्यापैकी 33 शतकं ही भारताला विजय मिळवून देणारी ठरली आहे. विराट कोहलीच्या 38 वन डे शतकांपैकी 31 शतकं भारताला विजय मिळवून देणारी ठरली आहेत.3 / 5ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वन डे शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकर आणि कोहली यांनी ऑस्ट्रेलियात चार शतकं झळकावली आहेत आणि आगामी वन डे मालिकेत कोहलीला हा विक्रम नावावर करण्याची संधी आहे.4 / 5धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 39 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. विराट कोहलीला (38) हा विक्रम मोडण्यासाठी दोन शतकांची आवश्यकता आहे. वन डे क्रिकेटचा विचार केल्यास कोहलीने सर्वाधिक 23 शतकं दुसऱ्या डावात केली आहेत, तर तेंडुलकरला केवळ 17 शतकं करता आली आहेत.5 / 5सर्वात जलद 20000 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्या नावावर आहे. या दोघांनी 453 डावांत वीस हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. कोहलीने 399 डावांत 19000 धावांचा विक्रम नावावर केला आहे आणि तेंडुलकर व लारा यांचा विक्रम मोडू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications