Join us  

Gautam Gambhir: "विराटची तुलना सचिनशी होऊ शकत नाही", गौतम गंभीरचं विधान अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:18 PM

Open in App
1 / 11

भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात 67 धावांनी विजय मिळवताना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीचे शतक, रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. विराट कोहलीने पहिल्या सामन्यातून वन डे क्रिकेटमधील 45 वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. विराटने 87 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकारांसह 113 धावा केल्या. विराटचे सोडलेले दोन झेल श्रीलंकेला महागात पडले.

2 / 11

विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीनंतर संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने एक विधान केले आणि वादाला तोंड फुटले. खरं तर विराटची तुलना सचिनशी होऊ शकत नाही असे गंभीरने म्हटले आहे.

3 / 11

गंभीरने विराटबद्दल हे विधान करताच चाहत्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरूवात केली. गौतम गंभीर नेहमीच विराटबद्दल विविध विधाने करत असतो. याचाच दाखला देत विराटच्या चाहत्यांनी गंभीरविरूद्ध सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल केले.

4 / 11

पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 373 धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला पूर्णपणे अपयश आले.

5 / 11

प्रत्युत्तरात 374 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाला पूर्णपणे अपयश आले. श्रीलंकेचा संघ 50 षटकांत 8 बाद केवळ 306 धावा करू शकला.

6 / 11

विराटने 87 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकार ठोकत 113 धावा केल्या. यावर बोलताना माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराटची तुलना सचिनशी होऊ शकत नाही असे म्हटले आहे.

7 / 11

सचिनच्या काळात खेळपट्टीवर धावा करणे खूप अवघड होते, पण आता सोपे झाले असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. यावरून आता सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.

8 / 11

'सचिन तेंडुलकरच्या काळात सर्कलच्या बाहेर पाच खेळाडू असायचे. आता क्रिकेटमधील नियम बदलले आहेत, सर्कलच्या आत पाच खेळाडू असतात. त्या काळात फलंदाजाला खेळणे अवघड असायचे आता फलंदाजाला खेळणे सोपे आहे', असे गंभीरने म्हटले.

9 / 11

आताच्या खेळपट्टीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता सर्कलच्या आत पाच खेळाडू असतात त्यामुळे खेळाडूला फटके मारणे सोपे असते, असे गंभीरचे मत आहे.

10 / 11

विराट कोहलीचे वादळी शतक आणि रोहित शर्मा, शुबमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या सामन्यात 67 धावांनी विजय मिळवला.

11 / 11

विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक झळकावले. तर वन डे क्रिकेटमध्ये 45 शतके करून त्याने सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक विक्रमाकडे कूच केली आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाऑफ द फिल्डगौतम गंभीरट्रोलविराट कोहलीसचिन तेंडुलकर
Open in App