Virat Kohli Birthday : ३४ वर्ष अन् ३४ गोष्टी! विराट कोहलीच्या फॅन्सनाही नसेल याची माहिती

Virat Kohli Birthday : भारतीय संघाचा माजी कर्णधार, King Kohli, सुपरस्टार विराट कोहली याचा आज ३४वा वाढदिवस आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराटची बॅट ही प्रतिस्पर्धींना चांगलीच झोडून काढत आहे. पाकिस्तानविरुद्धची विराटची खेळी ही त्याच्या कारकीर्दितील सर्वोत्तम ठरली. आता चाहत्यांना भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा १५ वर्षांचा दुष्काळ संपवावा, अशी आस लागली आहे. पण, आज भारतीय संघ मेलबर्नमध्ये विराटचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली ३४वा वाढदिवस साजरा करतोय आणि आज आपण त्याच्याबाबतच्या ३४ गोष्टी जाणून घेणार आहोत.

विराट कोहलीला टोपणनाव 'चिकू' हे त्याचे प्रशिक्षक अजीत चौधरी यांनी दिले

१९९८मध्ये विराटच्या क्रिकेट कारकीर्दिला सुरुवात झाली. तेव्हा त्याने पश्चिम दिल्ली क्रिकेट संघटनेत नाव नोंदवले होते.

जुलै २००६मध्ये १९ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली आणि तामीळनाडू विरुद्ध तो पहिला सामना खेळला होता

१८ डिसेंबर २००६मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले, परंतु त्याही परिस्थितीत विराटने दुसऱ्या दिवशी कर्नाटकविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या.

२००८च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व विराटच्या खांद्यावर सोपवले गेले आणि त्याने तेव्हा वर्ल्ड कप जिंकलाही

इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १२ लाख रुपयांत विराटला करारबद्ध केले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या त्याला एका हंगामासाठी १५ कोटी रुपये देतात.

२००८मध्ये विराटने पहिली आंतरराष्ट्रीय वन डे मॅच खेळली होती.

२०१०मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी पहिली कसोटी मॅच खेळली

२०१३मध्ये विराट कोहली व अनुष्का शर्मा यांची एका जाहीरातीच्या शूटींग दरम्यान पहिल्यांदा भेट झाली

११ डिसेंबर २०१७मध्ये विराट व अनुष्का यांनी इटली येथे लग्न केले

जानेवारी २०२१मध्ये विराट व अनुष्काच्या घरी नन्ही परी आली. त्यांनी तिचे नाव वामिका असे ठेवले

क्रिकेटनंतर विराटला आवडणारा खेळ म्हणजे फुटबॉल

फुटबॉलच्या प्रेमापोटी त्याने इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा संघात गुंतवणूक केली

२०१७मध्ये फोर्ब्स मॅगझिनने विराट कोहलीला भारताचा most valuable celebrity brand म्हणून जाहीर केले

२०१८मध्ये फोर्ब्स मॅगझिनने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटिंमध्ये विराट ८३ व्या क्रमांकावर होता

मार्च २०१३ मध्ये विराट कोहलीने Virat Kohli Foundation ची स्थापना केली आणि ही संस्था गरीब मुलांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी काम करते.

विराट कोहलीचे प्राण्यांवरही प्रेम आहे आणि त्याने मुंबईत प्राण्यांसाठी दोन शेल्टर उभे केले आहेत

२०१३ मध्ये विराट कोहलीला पद्म श्री आणि अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१८मध्ये त्याला राजीव गांधी खेल रत्न हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार देण्यात आला

विराट कोहलीने वेगवेगळ्या सहा द्विदेशीय मालिकांमध्ये ३००+ हून धावा केल्या आहेत. आतापर्यंत एकाही खेळाडूला ४ पेक्षा अधिक द्विदेशीय मालिकांमध्ये असा पराक्रम करता आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय ट्वेटी-२० क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात ६०० हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याने २०१६मध्ये १०६.८३च्या सरासरीने या धावा केल्या होत्या.

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत ८९० रेटींग पॉईंट्स कमावणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने १९९८मध्ये ८८७ रेटींग पॉईंट्स कमावले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ६ द्विशतक झळकावण्याचा विक्रम विराटने केला आहे

वन डे क्रिकेटमध्ये विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्याच्या यशाची टक्केवारी ७५.८९ इतकी आहे आणि जी महेंद्रसिंग धोनीपेक्षा अधिक आहे

रिकी पाँटिंग ( २००६, २००७) आणि विराट कोहली ( २०१७, २०१८) हे दोनच असे खेळाडू आहेत की ज्यांनी सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी सलग दोन वर्ष जिंकली आहे.

विराट कोहलीनं जेव्हा कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले तेव्हा भारतीय संघ क्रमवारीत ७व्या स्थानावर होता आणि त्याने टीम इंडियाला नंबर १ करून दाखवले

सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावणारा विराट हा जगातील पहिला फलंदाज आहे. त्याने वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्धच्या मालिकेत हा पराक्रम केला.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ९व्या पर्वात विराट कोहलीने ९७३ धावा करून RCB ला फायनलपर्यंत पोहोचवले होते.

भारतीयांमध्ये सर्वात जलद वन डे शतकाचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००, ५०००, ६०००, ७०००, ८०००, ९००० आणि १०००० धावांचा विक्रम विराटने केला आहे

वन डे क्रिकेटमध्ये सलग तीन शतक झळकावणारा तो पहिला भारतीय आहे

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जगभरातील सेलिब्रेटींमध्ये विराटचा तिसरा क्रमांक येतो

विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले

मेलबर्न येथे विराट कोहलीच्या नावाने Kohli Crescent असा रोड आहे