Join us  

Virat Kohli Birthday : ३४ वर्ष अन् ३४ गोष्टी! विराट कोहलीच्या फॅन्सनाही नसेल याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 11:03 AM

Open in App
1 / 34

विराट कोहलीला टोपणनाव 'चिकू' हे त्याचे प्रशिक्षक अजीत चौधरी यांनी दिले

2 / 34

१९९८मध्ये विराटच्या क्रिकेट कारकीर्दिला सुरुवात झाली. तेव्हा त्याने पश्चिम दिल्ली क्रिकेट संघटनेत नाव नोंदवले होते.

3 / 34

जुलै २००६मध्ये १९ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली आणि तामीळनाडू विरुद्ध तो पहिला सामना खेळला होता

4 / 34

१८ डिसेंबर २००६मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले, परंतु त्याही परिस्थितीत विराटने दुसऱ्या दिवशी कर्नाटकविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या.

5 / 34

२००८च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व विराटच्या खांद्यावर सोपवले गेले आणि त्याने तेव्हा वर्ल्ड कप जिंकलाही

6 / 34

इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १२ लाख रुपयांत विराटला करारबद्ध केले होते.

7 / 34

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या त्याला एका हंगामासाठी १५ कोटी रुपये देतात.

8 / 34

२००८मध्ये विराटने पहिली आंतरराष्ट्रीय वन डे मॅच खेळली होती.

9 / 34

२०१०मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी पहिली कसोटी मॅच खेळली

10 / 34

२०१३मध्ये विराट कोहली व अनुष्का शर्मा यांची एका जाहीरातीच्या शूटींग दरम्यान पहिल्यांदा भेट झाली

11 / 34

११ डिसेंबर २०१७मध्ये विराट व अनुष्का यांनी इटली येथे लग्न केले

12 / 34

जानेवारी २०२१मध्ये विराट व अनुष्काच्या घरी नन्ही परी आली. त्यांनी तिचे नाव वामिका असे ठेवले

13 / 34

क्रिकेटनंतर विराटला आवडणारा खेळ म्हणजे फुटबॉल

14 / 34

फुटबॉलच्या प्रेमापोटी त्याने इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा संघात गुंतवणूक केली

15 / 34

२०१७मध्ये फोर्ब्स मॅगझिनने विराट कोहलीला भारताचा most valuable celebrity brand म्हणून जाहीर केले

16 / 34

२०१८मध्ये फोर्ब्स मॅगझिनने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटिंमध्ये विराट ८३ व्या क्रमांकावर होता

17 / 34

मार्च २०१३ मध्ये विराट कोहलीने Virat Kohli Foundation ची स्थापना केली आणि ही संस्था गरीब मुलांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी काम करते.

18 / 34

विराट कोहलीचे प्राण्यांवरही प्रेम आहे आणि त्याने मुंबईत प्राण्यांसाठी दोन शेल्टर उभे केले आहेत

19 / 34

२०१३ मध्ये विराट कोहलीला पद्म श्री आणि अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१८मध्ये त्याला राजीव गांधी खेल रत्न हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार देण्यात आला

20 / 34

विराट कोहलीने वेगवेगळ्या सहा द्विदेशीय मालिकांमध्ये ३००+ हून धावा केल्या आहेत. आतापर्यंत एकाही खेळाडूला ४ पेक्षा अधिक द्विदेशीय मालिकांमध्ये असा पराक्रम करता आलेला नाही.

21 / 34

आंतरराष्ट्रीय ट्वेटी-२० क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात ६०० हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याने २०१६मध्ये १०६.८३च्या सरासरीने या धावा केल्या होत्या.

22 / 34

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत ८९० रेटींग पॉईंट्स कमावणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने १९९८मध्ये ८८७ रेटींग पॉईंट्स कमावले होते.

23 / 34

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ६ द्विशतक झळकावण्याचा विक्रम विराटने केला आहे

24 / 34

वन डे क्रिकेटमध्ये विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्याच्या यशाची टक्केवारी ७५.८९ इतकी आहे आणि जी महेंद्रसिंग धोनीपेक्षा अधिक आहे

25 / 34

रिकी पाँटिंग ( २००६, २००७) आणि विराट कोहली ( २०१७, २०१८) हे दोनच असे खेळाडू आहेत की ज्यांनी सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी सलग दोन वर्ष जिंकली आहे.

26 / 34

विराट कोहलीनं जेव्हा कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले तेव्हा भारतीय संघ क्रमवारीत ७व्या स्थानावर होता आणि त्याने टीम इंडियाला नंबर १ करून दाखवले

27 / 34

सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावणारा विराट हा जगातील पहिला फलंदाज आहे. त्याने वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्धच्या मालिकेत हा पराक्रम केला.

28 / 34

इंडियन प्रीमिअर लीगच्या ९व्या पर्वात विराट कोहलीने ९७३ धावा करून RCB ला फायनलपर्यंत पोहोचवले होते.

29 / 34

भारतीयांमध्ये सर्वात जलद वन डे शतकाचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे

30 / 34

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००, ५०००, ६०००, ७०००, ८०००, ९००० आणि १०००० धावांचा विक्रम विराटने केला आहे

31 / 34

वन डे क्रिकेटमध्ये सलग तीन शतक झळकावणारा तो पहिला भारतीय आहे

32 / 34

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जगभरातील सेलिब्रेटींमध्ये विराटचा तिसरा क्रमांक येतो

33 / 34

विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले

34 / 34

मेलबर्न येथे विराट कोहलीच्या नावाने Kohli Crescent असा रोड आहे

टॅग्स :विराट कोहलीदिल्लीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरभारतीय क्रिकेट संघआयसीसी
Open in App