Join us

कोहलीला खुणावतोय अनेक दिग्गजांना न जमलेला 'विराट' विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 14:19 IST

Open in App
1 / 9

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व ( 3-0) गाजवल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष्य वन डे व कसोटी मालिकेवर आहे. पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द करावा लागला आणि रविवारी दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत कॅप्टन विराट कोहलीची बॅट तळपली नसली तरी तो कधी फॉर्मात येईल याचा नेम नाही.

2 / 9

कोहलीची प्रत्येक खेळी ही विक्रमाला कवेत घेणारी ठरते आणि त्यामुळेच तो आता अशा एका विक्रमासमीप पोहोचला आहे की जो सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अॅलन बॉर्डर आदी दिग्गजानांही जमलेला नाही.

3 / 9

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका दशकात सर्वाधिक धावांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहेच, पण त्याला याच कालावधीत असा एक विक्रम नोंदवण्याची संधी आहे, जो कोणालाही अद्याप जमलेला नाही.

4 / 9

सुनील गावस्कर यांनी 1970-79 या कालावधीत 22 शतकांसह 5901 धावा केल्या आहेत.

5 / 9

अॅलन बॉर्डर यांनी 1980-89 या कालावधीत 23 शतकांसह 12083 धावा केल्या आहेत

6 / 9

सचिन तेंडुलकरच्या नावावर 1990-99 या कालावधीत 46 शतकांह 14197 धावा आहेत.

7 / 9

रिकी पॉटिंगने 2000-2009 या दशकात 55 शतकांसह 18962 धावा केल्या आहेत.

8 / 9

कोहलीच्या नावावर 2010 - 2019 या कालावधीत 65 शतकांसह 19784 आंतरराष्ट्रीय धावा आहेत आणि त्याला 20000 धावा करण्याची संधी आहे.

9 / 9

दशकात 20000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे.

टॅग्स :विराट कोहलीसुनील गावसकरसचिन तेंडुलकर