Cricket Buzz»फोटो गॅलरी »विराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क!विराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 7:16 PMOpen in App1 / 10भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11 वर्ष पूर्ण केली. या 11 वर्षांच्या प्रवासात कोहलीनं कर्णधार म्हणून केलेल्या खास दहा विक्रमांवर जरा नजर टाकूया...2 / 10कोहलीनं 2008मध्ये श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सलग तीन कॅलेंडर वर्षांत ( 2016 ते 2018) तीनवेळा 1000 धावा करणारा कोहली हा पहिला भारतीय आहे. या काळात त्यानं 14 शतकं ठोकली.3 / 10वन डे क्रिकेटमध्येही कॅलेंडर वर्षांत सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने 15 डावांत हा पल्ला गाठला.4 / 10वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम नावावर करण्यापासून कोहली केवळ 7 शतकं दूर आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( 49) अव्वल स्थानावर आहे.5 / 10वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम कोहलीनं केला आहे. त्यानं 205 डावांत हा पराक्रम केला. तेच तेंडुलकरला 259 डावांत हा पल्ला गाठता आला होता.6 / 10त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 222 डावांत 11000 धावांचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. याही वेळेस त्यानं तेंडुलकरचा ( 276 डाव ) विक्रम मोडला.7 / 10वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर आहे आणि आंरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये आठव्या स्थानावर आहे. 8 / 10आयसीसीच्या वार्षिक वैयक्तिक पुरस्कारावर सलग तीन वेळा नाव कोरणारा कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. 9 / 10आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही कोहलीच्या ( 5412 धावा) नावावर आहे. एका मोसमात सर्वाधिक 973 धावांचा विक्रम त्याने केला. 2016च्या मोसमात त्याने चार शतकं ठोकली होती.10 / 10वर्ल्ड कप स्पर्धेच्या ( 2019) इतिहासात सलग पाच अर्धशतकं झळकावणारा तो पहिला कर्णधार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications