विराटसाठी कायपण! इंग्रजी वृत्तपत्रानं हिंदी भाषेत छापला मथळा; ऑस्ट्रेलियात किंग कोहलीचं जंगी स्वागत

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी ऑस्ट्रेलियात किंग कोहलीची हवा

टीम इंडियाचा स्टार क्रिकेट विराट कोहली बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी सर्वात आधी ऑस्ट्रेलियात पोहचल्याची चर्चा चांगलीच रंगली.

विराट कोहलीची क्रेझही जगभरात आहे. ऑस्ट्रेलिया मीडियाही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांनी किंग कोहलीचं 'विराट' स्वागत केल्याचा सीन पाहायला मिळाला.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात फक्त क्रीडा पानावरच नाही तर अनेक वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर किंग कोहलीच्या आगमानाची बातमी लावली आहे.

'द टेलिग्राफ'नं पहिल्या पानावर विराट कोहलीच्या बातमीला पसंती दिलीये. एवढेच नाही तर इंग्रजी दैनिकानं हिंदी भाषेत 'युगों की लडृाई' या मथळ्यासह खास अंदाजात विराट कोहली अन् टीम इंडियाचे स्वागत केल्याचे दिसते.

The Advertiser वृत्तपत्रानंही कोहलीचं स्वागत अगदी खास अंदाजात केल्याचे दिसते. कोहलीच्या आकडेवारीसह संपूर्ण पान किंग कोहलीसाठी त्यांनी वापरले आहे.

विराट कोहलीशिवाय ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालही झळकला आहे. त्याचा उल्लेख नवा किंग असा करण्यात आलाय.

विराट कोहली हा घरच्या मैदानातील मागील दोन कसोटी मालिकेत अपेक्षेला साजेसा खेळ करू शकलेला नाही. पण तरीही त्याचा दबदबा कायम असल्याची झलकच ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातून दिसून आलीये.

ऑस्ट्रेलियातील एन्ट्रीनं स्थानिक वृत्तपत्रांचं आकर्षण ठरलेला किंग कोहली आगामी मालिकेत आकर्षक खेळी करून दमदार कमबॅक करणार का? तेही पाहण्याजोगे असेल.

भारतीय संघासाठी बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा खूपच महत्त्वपूर्ण आहे. जर टीम इंडियाला ही मालिका अगदी तोऱ्यात जिंकायची असेल तर विराट कोहलीच्या भात्यातून धमाकेदार खेळीची नितांत आवश्यकता असेल.