विराट कोहलीची रोजची कमाई ६ लाख, अनुष्काचाही 'लाख' मोलाचा हातभार; जाणून घ्या दोघांची बक्कळ कमाई

भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची जोडी आपल्याला माहितच आहे. २०१७ मध्ये या दोघांनी इटलीमध्ये लग्न केले.

भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची जोडी आपल्याला माहितच आहे. २०१७ मध्ये या दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. हे कपल सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. विराटची गेल्या काही दिवसापासून खराब खेळी सुरू होती, त्यामुळे कोहलीवर अनेकांनी टीका केल्या. आता विराट पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. हे कपल कमाईतही पुढे आहे. चला जाणून घेऊया या कपलची कमाई किती आहे.

विराट कोहली याच्या नावाचा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये समावेश आहे. विराटचा जन्म १९८८ मध्ये झाला असून तो सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईत राहतो. कोहलीची एकूण संपत्ती सुमारे १०४६ कोटी रुपये आहे. त्याची वार्षिक सरासरी कमाई १५ कोटी रुपये आहे. एका आठवड्यात सुमारे १,२५,००,००० रुपये, २८,८४,६१५ रुपये आणि एका दिवसात सुमारे ५,७६,९१३ रुपये आहे.

विराट कोहलीकडे जगातील अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून पाहिले जाते. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत आणि जगभरात ओळख निर्माण केली आहे. विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघाच्या A ग्रेड करारात समावेश आहे. यामुळे तो करोडोंची कमाई करतो, तर दरवर्षी तो आयपीएलच्या माध्यमातूनही मोठी कमाई करतो. बीसीसीआयच्या A+ कराराद्वारे त्याला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. सामन्यात त्याला खेळाच्या स्वरूपानुसार सामना शुल्क दिले जाते.

विराट कोहली सोशल मीडियावरील त्याच्या फोटोंमुळे आणि प्रसिद्ध कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर मधूनही मोठी कमाई करतो. त्याने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केली आहे, यामधून त्याला भरघोस परतावा मिळतो.

एमपीएल, पेप्सी, फिलिप्स, फास्ट्रॅक, बूस्ट, ऑडी, एमआरएफ, हिरो, व्होल्वोलिन, प्यूमा यांसारख्या ब्रँडच्या जाहिरातींमधून विराट कोहली मोठी कमाई करतो. विराटने मोठी गुंतवणुकही केली आहे. कोहलीने ब्लू ट्राइब, चिझेल फिटनेस, नुएवा, गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि., स्पोर्ट कॉन्व्हो आणि डिजिट शेअर्स, यात त्याने गुंतवणूक केली आहे. त्याने ाकीह दिवसापूर्वीच दिवंगत गायक किशोर कुमार यांचा बंगला विकत घेतला आहे. यात त्याने रेस्टॉरंट सुरू केले आहे. कोहलीच्या या रेस्टॉरंटचे नाव 'One8 Commune' आहे.

विराटचे इन्स्टाग्रामवर २२० मिलियन फॉलोअर्स आहे, त्याची त्यावरुनही मोठी कमाई होते. इंस्टाग्रामवरील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत त्याचा समावेश होतो. लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यानंतर इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला स्पोर्ट्स सेलिब्रिटींच्या यादीत विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. हूपर एचक्यू २०२२ इंस्टाग्राम रिच लिस्ट मध्ये टॉप-20 मध्ये भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा नंतर विराट कोहली एकमेव आशियाई आहे. यानुसार कोहली त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ८.९ कोटी रुपये मिळतात.

विराटकडे कारचाही मोठा ताफा आहे. त्याच्याकडे बेंटले फ्लाइंग स्पर या कारची किंमत अंदाजे रु. १.७० ते ३३.४१ कोटी आणि बेंटले कॉन्टिनेंटल जीटी याची किंमत अंदाजे रु. ३.२९-४.०४ कोटी आहे.पण या विराटच्या भावाच्या नावावर आहेत.

विराटची सेलिब्रिटी पत्नी अनुष्का शर्माची कमाईही जोरदार आहे. शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून चित्रपट प्रवासाला सुरुवात करणारी अनुष्का आज आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक आहे. सुमारे दीड दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले.

अनुष्का कमाईमध्ये विराटच्या पाठिमागे आहे. अनुष्काची एकुण कमाई ३५ मिलियन डॉलर आहे. म्हणजेच २८५ कोटी रुपये आहे. चित्रपटाव्यतिरिक्त, तिच्याकडे कमाईचे अनेक स्त्रोत आहेत, यात सोशल मीडिया आणि जाहिरातींचा समावेश आहे. अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये घेते. तिचे वार्षिक उत्पन्न १२ कोटींहून अधिक आहे. याशिवाय प्रत्येक जाहिरातीसाठी ती सुमारे ४ ते ५ कोटी इतकी मोठी रक्कम घेते.