विराट कोहलीचा 'दिलदारपणा'! सहकारी खेळाडूला 'गिफ्ट' म्हणून देऊन टाकली बॅट अन् किट बॅग

Virat Kohli gifted Bat Kit Bag: विराटने सामना संपल्यानंतर केलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होतंय

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने तब्बल १३ वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले, पण तो फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला केवळ ६ धावाच करता आल्या.

या सामन्यानंतर विराट कोहलीचा दिलदारपणा दिसून आला. त्याने आपल्या सहकारी खेळाडूचा गिफ्ट म्हणून आपली सही केलेली बॅट आणि क्रिकेटची किट बॅग देऊन टाकली.

रणजी ट्रॉफी सामन्यात विराट कोहलीला त्याच्या बॅटने फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण त्याने आपल्या स्वभावातील दिलदारपणा दाखवत साऱ्यांची मनं जिंकली.

विराटने युवा क्रिकेटपटू सनत सांगवान याला आपली बॅट आणि किट बॅग भेट दिली. सनतने स्वत: यासंबंधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहीली आणि साऱ्यांना याबाबत सांगितले.

विराटचा दिलदारपणा पाहून चाहत्यांनी किंग कोहलीचे तोंडभरून कौतुक केले. सनतने केलेल्या पोस्टच्या खालीही साऱ्यांनी कोहलीच्या स्वभावाचे गुणगान गायले.

दरम्यान, रेल्वेविरूद्धच्या सामन्याच फलंदाज म्हणून विराट काहीही विशेष करू शकला नसला तरी त्याच्या संघाने एक डाव आणि १९ धावांनी विजय मिळवला.