विराट कोहली सध्या पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासह मुंबईतील अपार्टमेंटमध्ये राहत आहे. 30 कोटींत त्यानं 2017मध्ये वरळीत अपार्टमेंट खरेदी केला आहे.
पण, याहीपेक्षा गुरूग्राम येथील त्याचा बंगला आलिशान आहे. विराटच्या श्रीमंतीचा थाट हा बंगला पाहून कळून चुकतो.
भारतीय संघाचा कर्णधार पश्चिम दिल्ली येथील उत्तम नगर येथे लहानाचा मोठा झाला. क्रिकेटमधील यशानंतर तो मीरा बाग येथील पश्चिम विहार येथे कुटुंबीयांसह राहायला गेला.
आता त्याचे संपूर्ण कुटुंब हरयाणातील गुरुग्राम येथील आलिशान बंगल्यात राहतात.
गुरूग्राम येथील DLF Phase 1 येथे कोहलीचा हा बंगला आहे. 80 कोटींमध्ये त्यानं हा बंगला खरेदी केला आहे.