Join us  

क्रिकेटचा King कमाईतही 'विराट', 1000 कोटींहून अधिक संपत्ती; जगतो आलिशान लाईफ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 5:27 PM

Open in App
1 / 6

Virat Kohli Networth : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आज(5 नोव्हेंबर 2023) 35 वर्षांचा झाला. क्रिकेटच्या मैदानावर विराट बॅटने धावांचा पाऊस पाडतो, तर कमाईच्या बाबतीतही तो खूप पुढे आहे. एकीकडे क्रिकेटच्या माध्यमातून तो करोडोंची कमाई करतो, तर दुसरीकडे अनेक कंपन्यांमध्ये ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. एवढंच नाही तर विराटने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केली आहे, जिथून त्याची बंपर कमाई होते.

2 / 6

127 मिलियन डॉलर्सची संपत्ती- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये विराटच्या नावाचा समावेश होतो. रिपोर्ट्सनुसार, कोहलीची एकूण संपत्ती 127 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 1046 कोटी रुपये आहे. विराटची सरासरी वार्षिक कमाई 15 कोटी रुपये आहे. विराट एका महिन्यात 1,25,00,000, एका आठवड्यात 28,84,615 आणि एका दिवसात सुमारे 5,76,923 रुपये कमाई करतो. कमाईच्या बाबतीत विराट कोहलीचा जगातील 100 श्रीमंत खेळाडूंमध्ये समावेश होतो.

3 / 6

विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघाच्या A ग्रेड करारामध्ये समावेश करण्यात आला आहे. यातूनही तो कोट्यवधी रुपये कमावतो. बीसीसीआयच्या A+ कराराद्वारे त्याला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय, मॅच फी म्हणून वेगळे पैसे दिले जातात. ही फी सामन्यांवर अपलंबून असते. याशिवाय, दरवर्षी आयपीएलच्या माध्यमातूनही त्याची प्रचंड कमाई होते.

4 / 6

विराट सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या जाहिराती करतो, त्यातूनही त्याची बंपर कमाई होते. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 260 मिलियन फॉलोअर्स आहेत. हूपर एचक्यू 2022 इंस्टाग्राम रिचलिस्ट नुसार, भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा नंतर विराट कोहली टॉप-20 मध्ये एकमेव आशियाई आहे. यानुसार कोहली त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो.

5 / 6

विराटने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केली आहे, जिथून त्याला चांगले रिटर्न्स मिळतात. कोहलीने ब्लू ट्राइब, चिझेल फिटनेस, नुएवा, गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी आणि Digit सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. याशिवाय, त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा एंडोर्समेंटमधूनही येतो. विराट मान्यवर, MPL, Pepsi, Philips, Fastrack, Boost, Audi, MRF, Hero, Valvoline, Puma यांसारख्या ब्रँडच्या जाहिरातींमधून भरपूर पैसे कमावतो.

6 / 6

कमाईनुसार विराटची लाईफस्टाईलही खूप आलिशान आहे. कोहलीकडे अनेक आलिशान आणि महागड्या गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या कलेक्शनमध्ये ऑडी क्यू7 (सुमारे 70 ते 80 लाख रुपये), ऑडी आरएस5 (सुमारे 1.1 कोटी रुपये), ऑडी आर8 एलएमएक्स (सुमारे 2.97 कोटी रुपये), ऑडी ए8एल डब्ल्यू12 क्वाट्रो (सुमारे 1.98 कोटी रुपये), लँड रोव्हर यांचा समावेश आहे.

टॅग्स :विराट कोहलीवन डे वर्ल्ड कपपैसाव्यवसायगुंतवणूक