Join us  

सुपरहिट जोडी! रोहित शर्मा - विराट कोहलीने मोडला ३२ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; हिटमॅनचा विक्रमांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 4:17 PM

Open in App
1 / 5

शुबमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीने सोबत १००५+ धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडून सर्वात कमी १२ इनिंग्जमध्ये १०००+ धावांची भागीदारी करणारी ही पहिली जोडी ठरली. याआधी रोहित व लोकेश राहुल यांनी १४ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला होता.

2 / 5

रोहितने वन डे क्रिकेटमध्ये १००००+ धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहलीनंतर ( २०५ इनिंग्ज) सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रम रोहितने ( २४१) नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकर ( २५९ ), सौरव गांगुली ( २६३) व रिकी पाँटिंग ( २६६) यांना मागे टाकले.

3 / 5

विराट कोहलीसह रोहितने एक वेगळा विक्रम नोंदवला. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा मान या दोघांनी पटकावला. सौरव गांगुली/सचिन तेंडुलकर ( ८२२७) आणि शिखर धवन/रोहित शर्मा ( ५१९३) यांच्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये ५०००+ धावांची भागीदारी करणारी रोहित/विराट ही तिसरी भारतीय जोडी ठरली. पण, रोहित-विराटने ८६ इनिंग्जमध्ये हा पल्ला ओलांडला आणि या दोघांनी गॉर्डन ग्रीनिज व हायनेस यांचा ( ९७ इनिंग्ज) ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

4 / 5

रोहितने षटकाराने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आशिया चषक ( वन डे ) स्पर्धेत १०वेळा ५०+ धावा करणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला, त्याने सचिन तेंडुलकरचा ( ९) विक्रम मोडला. नवज्योत सिंद्धू ( ७) व गौतम गंभीर ( ६) यांचा क्रमांक नंतर येतो.

5 / 5

वन डे क्रिकेटमध्ये रोहितने ८००० धावांचा टप्पा आज ओलांडला आणि आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माविराट कोहली