रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं मेगा लिलावात देश विदेशातील १४ खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावली. यात ७ परदेशी तर ७ भारतीय खेळाडूंचा समावेश करत खेळाडूंना करोडपती करताना आरसीबनं फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला वापरल्याचे दिसून येते.
आयपीएल लिलावात RCB नं कोणत्या खेळाडूसाठी किती पैसा खर्च केला? कसा असेल आयपीएलच्या आगामी हंगामासाठी त्यांचा संघ यावर एक नजर
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जोश हेजलवूड या यादीत टॉपला आहे. १२ कोटी ५० लाख रुपयांसह RCB च्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
आरसीबीच्या महागड्या शॉपिंगच्या यादीत दुसरा नंबरही परदेशी खेळाडूचा लागतो. इंग्लंडच्या फिल सॉल्टसाठी त्यांनी ११ कोटी ५० लाख रुपये मोजले.
भारतीय विकेट किपर बॅटर जितेश शर्माही यादीत आहे. त्याच्यासाठी RCB नं ११ कोटी खर्च करण्याची तयारी दर्शवली.
स्विंगचा बादशहा भुवनेश्वर कुमारही RCB च्या महागड्या खेळाडूंच्या यादीतील टॉपचा खेळाडू आहे.
भारतीय अनकॅप्ड रसीख दारसाठी RCB नं तब्बल ६ कोटी रुपये मोजल्याचे पाहायला मिळाले.
क्रुणाल पांड्या गत हंगामात आरबीकडून खेळताना दिसणार आहे. त्याच्यासाठी बंगळुरुच्या संघानं ५ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले आहेत.
अनसोल्ड देवदत्त पडिक्कलसह टीम डेविड, जेकब यांच्यासह सुयश शर्मा (भारत), नुवान थुशारा (श्रीलंका) रोमारिओ शेफर्ड (वेस्ट इंडिज), लुंगी एनिग्डी (दक्षिण आफ्रिका) यांचाही RCB च्या करोडपती खेळाडूंच्या यादीत समावेश होतो.
आगामी आयपीएल हंगामासाठी असा आहे RCB चा संघ