पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे.
युव्हेंटसच्या या खेळाडूकडे Gulfstream G650 हे खास जेट आहे. त्याची किंमत 280 कोटींपर्यंत आहे.
रोनाल्डोच्या या जेटच्या दरवाज्याच्या एका बाजूला CR7 लिहिलं आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याची सेलिब्रेशन स्टाईल रेखाटली आहे.
रोनाल्डोचा कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी यानेही 2004मध्ये Gulfstream V मॉडेल खरेदी केलं.
125 कोटी किमतीच्या या विमानात सर्व सुविधा आहेत. जेटच्या शेपटावर मेस्सीच्या जर्सी क्रमांक आहे.
त्यानं जेटच्या पायरीवर पत्नी अँटोनेलासह मुलगा थिएगो, सिरो आणि मॅटेओ यांची नावं लिहिली आहेत.
दिग्गज बॉक्सर फ्लॉयड मेवेदर याच्याकडे सर्वात महागडे जेट आहे.
मेवेदरच्या जेटची किंमत 450 कोटी आहे. त्यानं स्वतःसाठी Gulfstream G650 हे जेट तयार करून घेतलं आहे.
तो जगभर त्याच्या खाजगी जेटनेच प्रवास करतो.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे गतवर्षी न्यूझीलंडमध्ये त्यांच्या प्रायव्हेट जेटनं गेले होते.
त्याच्या या जेटची किंमत 125 कोटी इतकी आहे. Cessna 680 Citation Sovereign या मॉडेलचा हा जेट आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही 260 कोटींचं प्रायव्हेट जेट विकत घेतल्याचे वृत्त आहे. पण, हे वृत्त तथ्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2016मध्ये बॉलिवूड अभिनेता वरूण धवननं सचिनसह जेटमधील एक फोटो पोस्ट केला होता. तो सचिनचा असल्याची चर्चा रंगली.