Join us  

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: 'आता तु मला शिकवणार?'; विराट कोहली अन् गौतम गंभीर एकमेकांना नेमकं काय म्हणाले...पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 8:55 AM

Open in App
1 / 11

आयपीएलमध्ये सोमवारी मध्यरात्री इकाना स्टेडियमवर यजमान लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. आरसीबीने हा सामना १८ धावांनी जिंकला. यानंतर विराट कोहली आणि लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात मैदानावर जोरदार भांडण झाले. यामुळे दोघांमधील मतभेद चव्हाट्यावर आले.

2 / 11

दोघांवरही बीसीसीआयने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या शंभर टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे. कोहली- गंभीर यांनी गुन्हा कबूल केला असून लखनौचा नवीन उल हक याच्यावर ५० टक्के रकमेचा दंड आकारण्यात आला.

3 / 11

सामना संपल्यानंतर विराट लखनौचा कॅरेबियन अष्टपैलू काइल मेयर्सशी सामान्य संभाषण करीत होता. त्याचवेळी गौतम गंभीर तिथे पोहोचला आणि मेयर्सचा हात खेचून त्याला दूर घेऊन गेला. कोहलीशी बोलण्याची गरज नाही, असे तो सांगण्याचा प्रयत्न करीत होता. अपमान झाल्याचे समजून कोहली आणखी चिडला. त्याला आपली बाजूही मांडायची होती.

4 / 11

गौतमला स्पष्टीकरण द्यायचे होते. मैदानावर नेमके काय घडले ते सांगायचे होते. मात्र गौतम गंभीर चांगलाच संतापला होता. तो विराटशी बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता आणि तेथून काहीतरी बोलून निघून गेला. मात्र विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नेमका काय संवाद झाला, त्याची माहिती समोर आली आहे.

5 / 11

विराट कोहली आणि गौतम गंभीरचा वाद होत असताना प्रत्यक्षदर्शीने नेमकं काय घडलं, काय संवाद झाला?, याची माहिती दिली आहे. सामना संपल्यानंतर विराट लखनौचा कॅरेबियन अष्टपैलू काइल मेयर्सशी सामान्य संभाषण करीत होता.

6 / 11

तु आमच्या खेळाडूला शिव्या का देतोयस?, असं मेयर्सने कोहलीला विचारले. यावर तो मला वारंवार डोळे का दाखवतोय?, असं उत्तर कोहलीने दिले. त्याचवेळी गौतम गंभीर तिथे पोहोचला आणि मेयर्सचा हात खेचून त्याला दूर घेऊन गेला.

7 / 11

गौतम गंभीरच्या या कृतीने विराट कोहली संतापला. तो काहीतरी फुटफुटला. ते पाहताच गंभीरने कोहलीला विचारले की, काय बोलतोय बोल...यावर विराट कोहली म्हणाला, मी तुला काही बोललोच नाही. तु का मध्ये घुसतोय?, असा सवाल विराट कोहलीने गंभीरला विचारला.

8 / 11

विराट कोहलीच्या या प्रश्नावर, तु जर माझ्या खेळाडूला बोलतोय म्हणजे माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली, असं गंभीर म्हणाला. यावर मग तु आपल्या कुटुंबाला सांभाळ, असं कोहली म्हणाला. त्यावर लगेच मग तु आता मला शिकवणार..., असं प्रत्युत्तर गंभीरने दिले.

9 / 11

१० एप्रिलच्या रात्री लखनौने बंगळुरुला घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर गंभीरच्या हावभावाने वादाला सुरुवात झाली. या अपमानाची वेदना कोहलीच्या हृदयात कुठेतरी दडली होती. काल विराटने कृणाल पांड्याचा लॉंग ऑफवर झेल घेतला तेव्हा त्याचा उत्साह पाहण्यासारखा होता. तो स्टँडकडे बघत छाती ठोकत होता आणि मग फ्लाइंग किस दिला. यानंतर बहुधा त्याने तोंडावर बोट ठेवून आपला बदला घेतला. डगआऊटमध्ये बसून गंभीर शांतपणे हे पाहत होता.

10 / 11

सामना संपल्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करीत होते. अफगाणिस्तानचा नवीन उल-हक आणि कोहली यांच्यात वाद सुरु झाला. कोहलीला त्याच्या सहकाऱ्यांनी लांब नेले. तत्पूर्वी, नवीन फलंदाजी करीत असताना विराटसोबत त्याची बाचाबाची झाली होती.

11 / 11

कोहली खूपच आक्रमक दिसत होता. सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंसोबत त्याचा वाद झाला. नवीन-उल-हक याच्यापासून वादाची सुरुवात झाली. यानंतर तो अमित मिश्रा आणि गौतम गंभीर यांच्याशीही भिडला. अखेर लोकेश राहुल आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. या दोघांमध्ये दहा वर्षाआधीही बंगळुरू येथेच भांडण झाले होते.

टॅग्स :विराट कोहलीगौतम गंभीरआयपीएल २०२३
Open in App