Join us

दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची विराटसेनेची किमया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 14:55 IST

Open in App
1 / 5

एक आध्याय विराट कोहलीच्या पराक्रमी संघाने दक्षिण आफ्रिकेत लिहिलाय. दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची किमया विराटसेनेने साधलीय.

2 / 5

शार्दुल ठाकूरच्या (४/५२) भेदकतेनंतर रनमशीन विराट कोहलीच्या (१२९*) नाबाद शतकी तडाख्याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात ८ गड्यांनी धुव्वा उडवला.

3 / 5

दिमाखदार विजयासह टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेवर ५-१ असा कब्जा करताना यजमानांना अक्षरश: रडवले.

4 / 5

प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेला २०४ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने ३२.१ षटकात केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले.

5 / 5

सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर धावांचा पाठलाग करताना शिखर धवन (१८) आणि रोहित शर्मा (१५) या सलामीवीरांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. मात्र, यानंतर कोहलीने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना ३५वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय ‘विराट’ शतक झळकावले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीक्रिकेट