Join us  

VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 3:22 PM

Open in App
1 / 7

VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट विश्वातील दोन मोठे व्यक्तिमत्व आहेत. या दोघांवर BCCIने सध्या युवा पिढी घडवण्याची आणि भारतीय क्रिकेटला योग्य दिशा देण्याची जबाबदारी सोपवली आहे.

2 / 7

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला आणि दी वॉल द्रविडकडे भारताच्या सीनियर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दक्षिण आफ्रिका दौरा वगळल्यास द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मायदेशात चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आता आगामी दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण दिसणार आहे.

3 / 7

इंडियन प्रीमिअर लीग २०२२नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयर्लंडच्या दौऱ्यावर दोन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. त्याच दरम्यान भारताचा इंग्लंड दौरा असल्याने BCCI दोन वेगवेगळे संघ निवडणार असल्याची चर्चा आहे.

4 / 7

आता InsideSport ने दिलेल्या वृत्तानुसार दोन मुख्य प्रशिक्षकही निवडले जाणार आहेत. त्यानुसार दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत व्ही व्ही एस लक्ष्मण हा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दिसणार आहे.

5 / 7

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ १५ किंवा १६ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. अशात ९ जून पासून सुरू होणाऱ्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडल्या जाणाऱ्या टीम इंडियाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपविले जाईल आणि लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसेल.

6 / 7

'' बर्मिंगहॅम कसोटीआधी इंग्लंड दौऱ्यावर २४ जूनला लेइसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना होणार आहे. राहुल द्रविड व टीम १५ किंवा १६ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. त्यामुळे दक्षिण आफ्रिका व आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीसाठी व्ही व्ही एस लक्ष्मणला विचारणा करण्यात येणार आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी InsideSport ला सांगितले.

7 / 7

बीसीसीआयच्या निवड समितीची लवकरच बैठक पार पडणार असून दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी व इंग्लंड मालिकेसाठी असे दोन वेगवेगळे संघ निवडले जाणार आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाईल आणि हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीही इंग्लंड आणि श्रीलंका अशा दोन दौऱ्यांवर भारताचे दोन संघ खेळले होते. २३ मे रोजी या संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App