Join us

तो चेंडू रोहितकडे फेकणार होतो, पण...; त्या झेलवरील वादावर सूर्याचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 14:28 IST

Open in App
1 / 9

गेलेली फायनल मॅच हार्दिक पांड्याने आणि सूर्यकुमारने परत आणली होती. पांड्याने भारतासाठी धोकादायक ठरलेल्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले. सूर्यकुमारने सीमारेषेवर मिलरची अप्रतिम कॅच पकडली आणि तिथेच सामना भारताने जिंकल्यात जमा झाला. या कॅचवरून जगभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर पहिल्यांदाच सूर्याने उत्तर दिले आहे.

2 / 9

सूर्याने मिलरने सीमेवर टोलविलेला चेंडू सीमारेषेवर पकडला, वेगात असल्याने आपला तोल जात असल्याचे पाहून काही क्षणांत त्यांने तो चेंडू हवेत उडविला, सीमारेषा पार करत पुन्हा मैदानात येत त्याने तो झेलला आणि मिलर बाद झाला. २० व्या षटकात दक्षिण आफ्रिकेला १६ धावा हव्या होत्या. मिलरचा हा फटका षटकार झाला असता तर मॅच हातची गेली असती. यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे.

3 / 9

हा झेल कसा चुकीचा आहे, हे ठरविण्यात हे लोक लागले आहेत. सोशल मीडियावर या झेलवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा आऊट नाही तर सिक्स होता असे हे लोक सांगू लागले आहेत. यावर स्कायने प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 9

आमचे फिल्डिंग कोच दिलीप सरांनी मी, विराट, अक्षर आणि रविंद्र जाडेजा यांना नेहमी हॉटस्पॉटवर फिल्डिंगला लावण्याचे निर्देश दिले होते. हॉटस्पॉट म्हणजे जिथे चेंडू सारखा सारखा मारला जाण्याची शक्यता असते. मी जी कॅच घेतली त्याचा आधीपासून काही मैदानांवर हवेचा अभ्यास केला होता, असे सूर्याने सांगितले.

5 / 9

फायनलमध्ये मी थोडा वाईड उभा होतो. हार्दिक आणि रोहितने वाईड यॉर्करसाठी फिल्डिंग लावली होती. मिलरत्यात अडकला. त्याने थेट चेंडू माझ्यादिशेने टोलविला. काहीही करून मला ही कॅच पकडायचीच आहे, हे माझ्या डोक्यात सुरु होते, असे सूर्या म्हणाला.

6 / 9

मी जेव्हा चेंडू हातात घेतला आणि आत टाकला तेव्हा मी बाऊंड्री लाईनला टच केले नाही हे पाहिले. आता आत येताना परत जेव्हा चेंडू पकडेन तेव्हाही मला याचीच काळजी घ्यायची होता. जर हा सिक्स झाला असता तर समीकरण बदलले असले. पाच चेंडूंत १० धावा लागणार होत्या. आम्ही तेव्हाही जिंकू शकलो असतो परंतू अंतर बदलले असते, असे स्काय म्हणाला.

7 / 9

मॅचच्या आदल्या दिवशी आम्ही एक चांगले ट्रेनिंग सेशन ठेवतो ते फक्त कॅच पकडण्यासाठी असते. १० ते १२ मिनिटे प्रत्येक खेळाडू हाय कॅच, फ्लॅट, डायरेक्ट आणि स्लिप कॅचची प्रॅक्टिस करतो. मी हा अभ्यास आयपीएल व इतर देशांसोबतच्या सामन्यावेळीही करतो. फायनलमध्ये घेतलेली कॅच ही या अनेक वर्षे केलेल्या मेहनतीचाच परिणाम होता, असे तो म्हणाला.

8 / 9

त्या दिवशी वेगळीच फिल्डिंग लागलेली. रोहित कधी लॉन्ग-ऑनवर उभा राहत नाही. परंतू त्यावेळी तो तिथे होता. जेव्हा चेंडू माझ्यादिशेने येत होता तेव्हा तिकडे धावताना मी सर्वात आधी रोहितकडे पाहिले. मला चेंडू पकडायचाच होता, परंतू रोहित जवळ असता तर त्याच्याकडेच मी तो फेकला असता. पण तो जवळ नव्हता. यानंतर डोक्यात चक्र फिरले आणि मी मैदानाबाहेर जाऊन परत झेल टिपण्याचा मार्ग निवडला, असे सूर्यकुमार यादव म्हणाला.

9 / 9

या झेलनंतर मला अनेकांनी फोन केले, हजारो मेसेज आले आहेत. या पाच सेकंदांसाठी का होईना मी तिथे पोहोचलो होतो याचा मी खूप आभारी आहे, असे सूर्या म्हणाला.

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका