Join us  

वडील दिग्गज क्रिकेटर, मुलगा बनला एमएमए फायटर, रिंगमध्ये लावतोय पंच, पाहा कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 9:56 PM

Open in App
1 / 6

अनेकदा मुलं ही आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करतात. अनेक क्रिकेटपटूंची मुलंही वडिलांचाच वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र एका दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलाने क्रिकेटऐवजी वेगळ्याच क्षेत्रात करिअर बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

2 / 6

ज्या दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलाचा उल्लेख होत आहे, तो आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाल वासिम अक्रम याचा मुलगा तैमूर. तेमूर मिक्स्ड मार्शल आर्ट फायटर बनला आहे.

3 / 6

पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रमने संयुक्त अमिरातीमधील एका कार्यक्रमामध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे. अक्रमने सांगितले की, तैमूर एक हौशी एमएमए अॅथलिट आहे.

4 / 6

तैमूरने हल्लीच एका फाइटमध्ये भाग घेतला होता. तैमूर व्यावसायिक एमएमए फायटर होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिकेमध्ये राहत आहे, असे वासिम अक्रमने सांगितले.

5 / 6

अक्रम म्हणाला की, माझा मुलगा तैमूर अमेरिकेमध्ये राहत आहे. तिथे क्रिकेट फारसं खेळलं जात नाही. मी माझ्या मुलांना त्यांच्या मर्जीने जीवन जगण्याची परवानगी दिली आहे. जर त्याला फायटर व्हायचं असेल तर त्याने त्याचं स्वप्न अवश्य पूर्ण केलं पाहिजे.

6 / 6

दरम्यान वासिम अक्रमसुद्धा स्व:तच्या फिटनेसबाबत जागरुक असतो. तसेच दररोज जिममध्ये कसरत करत असतो. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये १०४ कसोटीत ४१४ आणि ३५६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०२ बळी टिपले होते.

टॅग्स :वसीम अक्रमपाकिस्तानआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App