Join us

भारतीय स्पोर्ट्स अँकर Yesha Sagar सोबत असं काय घडलं की रातोरात सोडावा लागला बांगलादेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:59 IST

Open in App
1 / 9

बांगलादेश प्रीमियर लीग २०२५ यावेळी अनेक वादांमुळे चर्चेत आहे. प्रथम खेळाडूंना त्यांचे मानधन न मिळाल्याच्या बातम्या आल्या. नंतर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले. आता त्याच लीगमध्ये कॅनडास्थित भारतीय स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल येशा सागर देखील चर्चेत आहे.

2 / 9

येशा सागरने तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण याचदरम्यान, येशा सागरबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या लीग दरम्यान, येशा सागरसोबत असे काहीतरी घडले, ज्यामुळे तिला घाईघाईने थेट बांगलादेशच सोडावे लागले.

3 / 9

येशा सागर बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चितगाव किंग्ज संघासाठी स्पोर्ट्स अँकर म्हणून काम करत होती. या लीगच्या मध्येच संघ मालकांनी येशावर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यानं रातोरात येशाने लीग अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला.

4 / 9

बांगलादेश न्यूज पोर्टल क्रिकेट९७ च्या वृत्तानुसार, चित्तगाव किंग्ज संघाचे मालक समीर कादर चौधरी यांनी येशा सागरला नोटीस पाठवली होती. येशाने केलेल्या कराराच्या अटी आणि शर्तींचे पालन न केल्याबद्दल तिला कायदेशीर नोटीस पाठवली होती.

5 / 9

चित्तगाव किंग्जचे मालक समीर कादर चौधरी यांनी नोटीसमध्ये लिहिले की, कराराच्या कलम ९ नुसार येशा सागर हिने कराराचे नियम पाळण्यात कसूर केली. अधिकृतपणे आमंत्रितांच्या यादीत असूनही येशा प्रायोजकांसोबतच्या जेवणाला उपस्थित राहिली नाही.

6 / 9

येशाने प्रायोजकांसाठीचे शूटिंग आणि प्रमोशनल शाऊट-आउट देखील पूर्ण केले नाही. तिच्या अनुपस्थितीमुळे फ्रँचायझीचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच फ्रँचायजीची प्रतिष्ठाही मलीन झाल्याचे आरोप तिच्यावर केले आहेत.

7 / 9

चित्तगाव किंग्जचे मालक समीर कादर चौधरी यांनी येशा सागरच्या गैरवर्तणुकीसाठी तिला कायदेशीर नोटीस बजावली असून त्यावर तिच्याकडून उत्तर मागण्यात आले होते. पण येशा सागरने नोटीसला उत्तर न देता बांगलादेश लीग सोडली.

8 / 9

येशा सागरचा जन्म पंजाबमध्ये झाला. डिसेंबर २०१५ मध्ये ती उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेली. स्पोर्ट्स अँकरिंग करण्यापूर्वी तिने मॉडेलिंग आणि अभिनय देखील केला आहे. तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये अभिनय केला.

9 / 9

येशा सध्या क्रिकेटच्या मैदानावर आपल्या सौंदर्याने चाहत्यांना मोहिनी घातलाना दिसते आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. येशाने आधी ग्लोबल टी२० कॅनडा आणि यूपी टी२० लीगमध्येही काम केले आहे.

टॅग्स :बांगलादेशऑफ द फिल्डभारतकॅनडा