Join us  

पाकिस्तानकडे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची हिंमत नाही; भोगावे लागतील परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 4:22 PM

Open in App
1 / 7

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ( PCB) आडमुठेपणा होत असताना आता क्रीडा मंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे पाकिस्ताच्या वर्ल्ड कप सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पण, पाकिस्ता वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे धाडस करू शकत नाही.

2 / 7

५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतात वन डे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. PCB वारंवार नाटक करत असल्यामुळे स्पर्धा वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब झाला. पण, तरीही पाकिस्तान बोर्डाकडून वारंवर धमकी दिली जात आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारत पाकिस्तानला येणार नसल्याने त्यांचा जळफळाट झाला आहे.

3 / 7

त्यात पाकिस्तानचे क्रीडा मंत्री एहसान माझरी यांच्या विधानाची चर्चा रंगलीय. पाकिस्तानकडे आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद होतं, परंतु बीसीसीआयने नकार दिल्यावर ही स्पर्धा दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. त्यावरून क्रीडा मंत्र्यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, ''जर भारताने आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा हट्ट धरला, तसाच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपण मागणी करायला हवी.''

4 / 7

जर पाकिस्तानने २०२३ च्या वन डे वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) PCB ला निधी देणे थांबवू शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कमाईपैकी ५० टक्के रक्कम आयसीसीकडून येते. आयसीसीच्या वितरण योजनेनुसार, पुढील ४ वर्षांत PCBला २८५ कोटी रुपये मिळणार आहेत.

5 / 7

ICC चार वर्षांत सुमारे ४९५६ कोटी रुपयांचा निधी वितरित करेल, त्यात भारताचा सर्वात मोठा वाटा असणार आहे. ICC च्या महसुलात भारताला ३८.५० टक्के वाटा मिळणार आहे. जर पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेतला नाही तर तो एक क्रिकेट राष्ट्र म्हणून संपूर्ण जगापासून वेगळा होईल.

6 / 7

२००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक संघांनी पाकिस्तानात येणे टाळले होते. गेल्या एक-दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड या देशांनी पाकिस्तानला भेट दिली आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपली प्रतिमा खराब करायची नाही. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. वन डे वर्ल्ड कपसाठी भारताचा दौरा न केल्यास, आयसीसी त्यांच्याकडून यजमानपद काढून घेऊ शकते.

7 / 7

मोठ्या स्पर्धांमध्ये आयसीसीच्या कमाईचा एक मोठा भाग हा फक्त भारताच्या सामन्यांमधून येतो. पाकिस्तानला २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे, जे त्याला चुकवायचे नाही. वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यास आयसीसी पाकिस्तान संघावरही बंदी घालू शकते.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानआयसीसी
Open in App