भारत Super 8 मध्ये कोणाला भिडणार? तगड्या संघांचे आव्हान असणार! पण, हे कसं ठरणार?

What is Super 8 in T20 World Cup? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेने आतापर्यंत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला लावले आहेत.. युगांडाने त्यांचा वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवला, नवख्या अमेरिकेने माजी विजेत्या पाकिस्तानला लोळवले, अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर न्यूझीलंडने गुडघे टेकले, इत्यादी.. त्यामुळे Super 8 ची चुरस रंगतदार झालेली दिसतेय..

ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांनी आपापल्या गटात सलग तीन विजयांची नोंद करून सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले आहेत. पहिल्या फेरीतील चार गटांतून प्रत्येकी २ असे ८ संघ Super 8 साठी पात्र ठरणार आहेत आणि अजूनही ६ जागांसाठी कडवी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

भारत आणि अमेरिका हे अ गटातील दोन अपराजित संघ आज समोरासमोर आहेत आणि विजयी संघ सुपर ८ मध्ये आपली जागा पक्की करण्यास यशस्वी होईल. पण, सुपर ८ मध्ये संघाची विभागणी दोन गटांत कशाच्या आधारावर केली जाईल, हा चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे.

१९ जूनपासून Super 8 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे आणि २५ जूनपर्यंत उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित होणार आहेत. २७ जूनला उपांत्य फेरीच्या लढती होतील, तर २९ जूनला फायनल होणार आहे. Super 8 मध्ये ८ संघांची विभागणी दोन गटांत केली जाणार आहे आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

पहिल्या फेरीतील अ व क गटातील अव्वल संघ आणि ब व ड गटातील दुसऱ्या क्रमांकाचे संघ... असा पहिला गट तयार केला जाणार आहे. सुपर ८ मधील दुसऱ्या गटात ब व ड गटातील अव्वल संघ आणि अ व क गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ असतील. हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतील आणि अव्वल दोन संघ आगेकूच करतील.

भारतीय संघ अ गटातून अव्वल स्थानासह Super 8 साठी पात्र ठरेल. त्यांच्यासमोर क गटातील अव्वल संघ असेल. जर या गटातून न्यूझीलंड पात्र न ठरल्यास भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान असू शकते. ब व ड गटातून स्कॉटलंड/इंग्लंड आणि बांगलादेश/नेदरलँड्स यांच्यापैकी एक संघ असू शकेल,