Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारत Super 8 मध्ये कोणाला भिडणार? तगड्या संघांचे आव्हान असणार! पण, हे कसं ठरणार?भारत Super 8 मध्ये कोणाला भिडणार? तगड्या संघांचे आव्हान असणार! पण, हे कसं ठरणार? By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 4:55 PMOpen in App1 / 5ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांनी आपापल्या गटात सलग तीन विजयांची नोंद करून सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले आहेत. पहिल्या फेरीतील चार गटांतून प्रत्येकी २ असे ८ संघ Super 8 साठी पात्र ठरणार आहेत आणि अजूनही ६ जागांसाठी कडवी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 2 / 5भारत आणि अमेरिका हे अ गटातील दोन अपराजित संघ आज समोरासमोर आहेत आणि विजयी संघ सुपर ८ मध्ये आपली जागा पक्की करण्यास यशस्वी होईल. पण, सुपर ८ मध्ये संघाची विभागणी दोन गटांत कशाच्या आधारावर केली जाईल, हा चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. 3 / 5१९ जूनपासून Super 8 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे आणि २५ जूनपर्यंत उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित होणार आहेत. २७ जूनला उपांत्य फेरीच्या लढती होतील, तर २९ जूनला फायनल होणार आहे. Super 8 मध्ये ८ संघांची विभागणी दोन गटांत केली जाणार आहे आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 4 / 5पहिल्या फेरीतील अ व क गटातील अव्वल संघ आणि ब व ड गटातील दुसऱ्या क्रमांकाचे संघ... असा पहिला गट तयार केला जाणार आहे. सुपर ८ मधील दुसऱ्या गटात ब व ड गटातील अव्वल संघ आणि अ व क गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ असतील. हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतील आणि अव्वल दोन संघ आगेकूच करतील.5 / 5भारतीय संघ अ गटातून अव्वल स्थानासह Super 8 साठी पात्र ठरेल. त्यांच्यासमोर क गटातील अव्वल संघ असेल. जर या गटातून न्यूझीलंड पात्र न ठरल्यास भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान असू शकते. ब व ड गटातून स्कॉटलंड/इंग्लंड आणि बांगलादेश/नेदरलँड्स यांच्यापैकी एक संघ असू शकेल, आणखी वाचा Subscribe to Notifications