Cricket Buzz»फोटो गॅलरी »MS Dhoniचं बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर होतं प्रेम, पण Yuvraj Singh साठी केला त्याग?MS Dhoniचं बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर होतं प्रेम, पण Yuvraj Singh साठी केला त्याग? By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 3:30 PMOpen in App1 / 13बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातील नातं अनेकदा जोडलं गेलं आहे. अगदी रवी शास्त्री-अमृता सिन्हा ते विराट कोहली-अनुष्का शर्मापर्यंत बॉलिवूड-क्रिकेट नातं फुलत गेलं. काही नाती यशस्वी झाली, तर काही चर्चेपुरतीच मर्यादित राहिली.2 / 13भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि बॉलिवूड अभिनेत्रीच्या अफेअर्सची चर्चा रंगल्या होत्या. पण, हे अफेअर चर्चांपूरतेच मर्यादित राहिलं. 3 / 13बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर धोनीचं प्रेम होतं. पण, मित्र युवराज सिंगसाठी त्यानं प्रेमाचा त्याग केला. 4 / 13बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रीबाबत जाणून घेण्यासाठी धोनीनं दिग्दर्शक फराह खान ते शाहरुख खान यांच्याकडे चौकशीही केली होती. इतकंच नव्हे तर तिच्याशी भेट घडवून आणण्याची विनंतीही किंग खानकडे केली होती. 5 / 132007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजयानंतरची ही गोष्ट आहे. जेव्हा धोनी यशोशिखरावर होता आणि त्याचवेळी त्या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करत स्टार झाली होती.6 / 13आता ही अभिनेत्री कोण याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल?7 / 13ओम शांती ओम या चित्रपटातून स्टार झालेल्या दीपिका पादुकोनवर धोनीचं क्रश होतं. 8 / 13धोनीनं तिला सामना पाहायला येण्याचे निमंत्रणही दिलं होतं आणि ती स्टेडियममध्ये येऊन चिअर करतानाही दिसली होती.9 / 13पण, धोनीच्या नशीबी तिची साथ नव्हती. युवराज सिंगही दीपिकाच्या प्रेमात पडला होता. 10 / 13धोनीला हे कळलं तेव्हा त्यानं मैत्री निवडली आणि प्रेमाचा त्याग केला. 11 / 13युवराज सिंग आणि दीपिका यांचं प्रेम फार काळ टिकलं नाही. 12 / 13धोनीला याबाबत मीडियानं विचारलं तेव्हा त्यानं अफवा असल्याचं सांगितलं होतं, परंतु या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. अफवा अशीही होती की दीपिकाच्या सांगण्यावरून धोनीनं केसांची स्टाईल बदलली. 13 / 13अर्थात या सर्व चर्चा रंगल्या होत्या आणि हे सिद्ध करण्यासाठी काही ठोस पुरावे नाही. त्या वेळी योगायोगानं घडलेल्या घटनांवरून हा तर्क लावला गेला. आणखी वाचा Subscribe to Notifications