Cricket Buzz»फोटो गॅलरी »गंभीरपूर्वी कोणत्या क्रिकेटपटूंनी केली राजकारणाच्या पीचवर बॅटींग, जाणून घ्या...गंभीरपूर्वी कोणत्या क्रिकेटपटूंनी केली राजकारणाच्या पीचवर बॅटींग, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 5:26 PMOpen in App1 / 8भाजपामध्ये गौतम गंभीरने आज प्रवेश केला. गंभीरला दिल्लीतून लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकते, असे म्हटले जात आहे.2 / 8भारताचे माजी सलामीवीर सिद्धू 2004 ते 2014 या कालावधीमध्ये लोकसभा निवडणूकींमध्ये जिंकून आले होते. सध्या सिद्धू यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.3 / 8भारताचे माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद हे भारताने 1983 साली जिंकलेल्या विश्वचषकाच्या संघातील सदस्य होते. आझाद हे 1993 सालापासून भाजपामध्ये आहेत.4 / 8भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनने 2009 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूकही जिंकला. पण 2014 साली अझरला पराभव पत्करावा लागला.5 / 8भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनी दोनदा निवडणूक लढवली, पण त्यांना एकदाही जिंकता आले नाही.6 / 8भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान हे भाजपाबरोबर कार्यरत आहेत.7 / 8भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू मनोज प्रभाकर यांनी काँग्रेसकडून 1998 साली निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभव पत्करावा लागला.8 / 8भारताचा माजी कर्णधाक मोहम्मद कैफने निवडणूक लढवली खरी, पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. आणखी वाचा Subscribe to Notifications