Cricket Buzz»फोटो गॅलरी »वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी कोणतं स्टेडियम आहे लकी?वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी कोणतं स्टेडियम आहे लकी? By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:53 PMOpen in App1 / 7भारतीय संघ वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे आणि यावेळी त्यांना नशीबाची साथ मिळणार आहे. भारतीय संघाने एडबॅस्टन स्टेडियमवर आतापर्यंत दहा वन डेपैकी सात सामने जिंकले आहेत. 2013 पासून त्यांनी येथे सलग पाच वन डे सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तानविरुद्ध ( 2013 व 2017) मिळवलेल्या दोन सामन्यांचा समावेश आहे. 2 / 7यंदा एडबॅस्टन येथे भारताला यजमान इंग्लंड ( 30 जून) आणि बांगलादेश ( 2 जुलै) यांचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंडविरुद्ध भारताने येथे खेळलेले चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि 2017मध्ये बांगलादेशवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. 3 / 7भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना 16 जूनला मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. 2007 नंतर येथे भारताने वन डे सामना खेळलेला नाही. या मैदानावर भारताला आठपैकी तीनच सामने जिंकता आले आहेत. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने येथेच पाकिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला होता.4 / 7मँचेस्टर येथे भारतीय संघ 27 जूनला वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. 1983च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी सामन्यात याच मैदानावर भारताने विंडीजला 34 धावांनी पराभूत करून धक्कादायक निकालाची नोंद केली होती. त्यानंतर या मैदानावर उभय संघ पुन्हा खेळलेले नाहीत.5 / 7विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 5 जूनपासून वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना साउथम्पटन येथे होणार आहे. या मैदानावर भारताने तीनपैकी एक सामना जिंकलेला आहे आणि तोही 2004साली केनियाविरुद्ध. येथेच भारत 22 जूनला अफगाणिस्तानचा सामना करेल. 6 / 7भारताला ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. या मैदानावर भारतीय संघ सर्वाधिक 15 सामने खेळला आहे. त्यात त्यांना केवळ पाचच सामने जिंकता आले आणि 9मध्ये पराभव पत्करावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया येथे 1999च्या वर्ल्ड कपमध्ये भिडले होते आणि त्यात कांगारूंनी 77 धावांनी विजय मिळवला होता.7 / 7भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ( 13 जून) ट्रेंटब्रिज आणि श्रीलंकेविरुद्ध ( 6 जुलै) हेडिंग्ले येथे खेळणार आहे. ट्रेंटब्रिज येथे भारताने सातपैकी तीन सामने जिंकले आहेत. हेडिंग्लेमध्ये नऊपैकी तीनच सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications