Hot Model Photos Team India: क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. टीम इंडियातील अनेक क्रिकेटपटूंचा बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल्स यांच्याशी थेट संबंध आहे.
काही खेळाडूंच्या पत्नी या बॉलिवूडशी कनेक्टेड आहेत, तर काहींच्या गर्लफ्रेंड किंवा बहिण देखील मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित आहेत.
सध्या अशाच एका मॉडेलची चर्चा मॉडेलिंग क्षेत्रात रंगली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या मॉडेलचे टीम इंडियाशी थेट कनेक्शन आहे.
ही मॉडेल म्हणजे एकेकाळी IPL मधील मिस्ट्री गर्ल म्हणून व्हायरल झालेली मालती चाहर. मालती ही टीम इंडियाचा गोलंदाज दीपक चहरची सख्खी बहीण आहे.
मालती आधीपासूनच फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तिने याआधीही अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे. सध्या ती हॉट लूकमध्ये दिसली आहे.
मालतीने आपल्या सोशल मीडियावर मोजकेच फोटो पोस्ट करून तुरळक माहिती दिली आहे. लवकरच मालती एका प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे तिने लिहिले आहे. (फोटो सौजन्य- Malti Chahar Instagram )