भारतीय संघातील स्टार युवा खेळाडू अभिषेक फिल्डवरील धमाकेदार खेळीनंतर आता फिल्ड बाहेरील प्रेमाच्या खेळामुळे चर्चेत आहे.
अभिषेक शर्मा अन् त्याच्या कथित गर्लफ्रेंडची प्रेम कहाणी Reddit वरील दोघांच्या एका खास फोटोमुळे चर्चेत आली. ती अभिषेक शर्मासोबत दिसली अन् ही मिस्ट्री गर्ल्ड कोण? अभिषेक तिच्यासोबत डेटिंग करतोय का? असा प्रश्न चर्चेचा विषय ठरू लागला.
या मिस्ट्री गर्लचं नाव आहे लैला फैसल. जी लोकप्रिय LRF महिला लक्झरी ब्रँड ची संस्थापिका आहे.
अभिषेक शर्मा अन् लैला फैसल यांच्यात प्रेमाच गाणं वाजतंय. दोघे एकमेकांशी डेट करत असल्याची चर्चा सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण अद्याप दोघांनीही यावर मौनच बाळगलं आहे.
अभिषेक शर्मा आणि लैला फैसल दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात. एवढेच नाही तर इंग्लंड विरुद्धच्या अभिषेकच्या तुफान फटकेबाजीची झलक इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर करत लैलानं क्रिकेटवरील प्रेमाचे संकेतही दिल्याचे पाहायला मिळाले होते.
२४ वर्षीय लैला फैसल ही एका श्रीमंत घराण्यातील तरुणी असून सोशल मीडियावर शतकी पोस्टसह तिने २६.७ हजार फॉलोअर्स कमावला आहे.
क्रिकेटर्ससोबतच्या तिच्या अफेअर्सच्या चर्चेमुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये अधिक भर पडली तर नवल वाटू नये.
लैला फसल सोशल मी़डियावर खास फोटो शेअर करत असते. पण आतापर्यंत तिने शेअर फ्रेममध्ये अभिषेक शर्मा दिसलेला नाही. किंवा अभिषेकनं तिला फ्रेममध्ये घेत प्रेम दाखवलेले नाही.
डेटिंग सेटिंगची गोष्टीमुळे चर्चेत असलेली जोडी जमणार का? खुल्लम खुल्ला प्रेम करुया...हे गाणं ते जोडीनं गाणार का? ते येणारा काळच ठरवेल.