Hrithik Shokeen Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK Live: 'मुंबई इंडियन्स'ने हाय व्होल्टेज सामन्यात संधी दिलेला ऋतिक शोकीन कोण आहे?

मुंबईच्या संघासाठी आजच्या सामन्यात विजय अत्यावश्यक

Hritik Shokeen Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK Live: 'मुंबई इंडियन्स'चा संघ आज करो या मरोच्या लढतीत आज चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. आजच्या सामन्यासाठी मुंबईने संघात मोठा बदल केला.

मुंबई संघाने डॅनियल सॅम्स आणि रेली मेरेडिथ यांना संघात स्थान दिले. त्यासोबत त्यांनी फॅबियन अँलनच्या जागी ऋतिक शोकीनला संघात स्थान दिले आहे. जाणून घेऊया त्याच्याबद्दल...

ऋतिक शोकीन हा २१ वर्षीय क्रिकेट असून त्याला ऑफ स्पिनर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

२०१९ साली बांगलादेशात झालेल्या ACC Emerging Teams Asia Cup साठी भारत-अ संघात त्याची निवड करण्यात आली होती.

ऋतिक शोकीनने आतापर्यंत भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ८ सामन्यात ८ बळी घेत त्याने आपला ठसा उमटवला. २१ धावांत २ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

मुंबई इंडियन्सने त्याला यंदाच्या लिलावात २० लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले. पहिल्या सहा सामन्यात वाट पाहिल्यानंतर अखेर आज त्याला पदार्पणाची संधी मिळाली.