Cricket Buzz»फोटो गॅलरी »सौंदर्य अन् पराक्रम दोन्हीत अव्वल... दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पोहोचवणारी 'कॅप्टन' लॉरा वोल्वार्ड!सौंदर्य अन् पराक्रम दोन्हीत अव्वल... दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पोहोचवणारी 'कॅप्टन' लॉरा वोल्वार्ड! By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 3:42 PMOpen in App1 / 11'वर्ल्ड चॅम्पियन' ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पराभूत करत दक्षिण आफ्रिकन संघाने कमाल केली. लॉरा वोल्वार्ड हिच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने सलग दुसऱ्यांदा Women's T20 World Cup Final चे तिकीट मिळवले.2 / 11ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १३४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लॉरा वोल्वार्डच्या आफ्रिकन संघाने २ गड्यांच्या मोबदल्यात सहज १३५ धावांचे आव्हान पार केले.3 / 11बलाढ्य आणि कणखर ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करुन आफ्रिकेला दिमाखात फायनल गाठून देणाऱ्या कर्णधार लॉरा वोल्वार्ड बद्दल जाणून घेऊया.4 / 11लॉरा ही सध्या केवळ २५ वर्षांची आहे. तिचा जन्म २६ एप्रिल १९९९ ला वेस्टर्न केप येथे झाला. लहानपणीपासूनच क्रिकेटमध्ये करियर करण्याची तिचा इच्छा होती.5 / 11२०१३ साली वयाच्या १३व्या वर्षी तिला आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील निमंत्रितांच्या महिला संघात स्थान मिळाले. त्याच वर्षी तिला १९ वर्षाखालील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला.6 / 11U-19 संघाचे नेतृत्व केल्यावर वर्षी २०१६ मध्ये लॉराने वरिष्ठ महिला वनडे संघात पदार्पण केले. इंग्लंड विरूद्ध १६व्या वर्षी तिने ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका खेळले.7 / 11पदार्पणानंतर दुसऱ्याच सामन्यात तिने दमदार शतक ठोकले. ११४ धावांच्या भागीदारीत तिने एकहाती फटकेबाजी करत शतक झळकावले होते. त्यावेळी ती आफ्रिकेची सर्वात तरुण शतकवीर बनली होती.8 / 11२०१७ साली लॉराला दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा उदयोन्मुख महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला. पुढच्याच वर्षी तिचा आफ्रिकेच्या वार्षिक करारात समावेशही करण्यात आला.9 / 11२०१८ साली लॉरा वोल्वार्डला पहिल्यांदा महिला टी२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळाले. तेव्हापासून तिने सर्व टी२० वर्ल्डकप खेळले आहेत.10 / 11लॉराने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७६ सामन्यांत ३६च्या सरासरीने १,९२३ धावा केल्या आहेत. तिच्या नावे १ शतक आणि १२ अर्धशतके आहेत. १०२ ही तिची सर्वोत्तम धावसंख्या आहे.11 / 11२०२३च्या टी२० वर्ल्डकपमध्येही आफ्रिका फायनलमध्ये खेळली होती. त्यात लॉरा कर्णधार नव्हती पण तिने दमदार अर्धशतक ठोकले होते. यंदा मात्र तिला नेतृत्वाची संधी मिळाली असून तिने आपल्या संघाला पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचवले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications