कोण आहे टीम इंडियाच्या घोळक्यात दिसलेली ती कुरळ्या केसांची तरुणी? इथं पाहा फोटो

भारतीय पुरुष क्रिकेट संघासोबत दिसणारी एकमेव लेडी कोण? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडू शकतो.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडिया मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानत उतरण्यास सज्ज आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून टीम इंडियाच्या ताफ्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यात पुरुष संघासोबत दिसणारी एकमेव लेडी कोण? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडू शकतो.

चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात आगामी कसोटीची रणनिती आखणाऱ्या टीम इंडियाच्या घोळक्यात दिसणारी कुरळ्या केसांची तरुणी ही पुरुष संघातील स्टाफ सदस्यांमधील महिला चेहरा आहे.

या तरुणीचं नाव राजल अर्थात राजलक्ष्मी अरोरा असं आहे. जी टीम इंडियाच्या सोशल मीडिया टीमची भाग आहे.

पुण्यातील सिम्बॉसिस महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर राजलक्ष्मी अरोरा हिने कंटेंट राइटरच्या रुपात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

२०१५ मध्ये बीसीआयच्या सोशल मीडिया मॅनेजरच्या रुपात ती टीम इंडियाशी कनेक्ट झाली.

जवळपास नऊ वर्षांनंतर तिने सिनिअर प्रोड्युसर पदी झेप घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सोशल मीडिया हाताळण्यासोबतच राजल अरोरा BCCI मधील अंतर्गत तक्रार समितीच्या प्रमुखपदी देखील विराजमान आहे.

राजल प्रमुखपदी असणारी समिती खेळाडूंच्या गैरवर्तनाच्या तक्रारींवर देखरेख ठेवते.

राज लक्ष्मी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टा पेजवर तुम्हाला तिचे नाव राजल असेच दिसेल. टीम इंडियातही तिची ओळख याच नावाने आहे.

शालेय जीवनापासूनच क्रीडाप्रेमी असणारी राजल हिला बास्केटबॉल आणि नेमबाजीमध्ये अधिक रस होता. पण आता ती भारतीय क्रिकेट संघासोबत कनेक्ट असल्याचे दिसून येते.

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असून टीम इंडियाशी कनेक्ट असल्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ होताना दिसते.