Join us  

T20 World Cup : १४ खेळाडू अन् १६ सपोर्ट स्टाफ सदस्य! पण, चर्चा 'Rajlaxmi'ची; जाणून घ्या कोण आहे ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 1:18 PM

Open in App
1 / 8

Team India lands in Perth for T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. भारताचा १४ सदस्यीय संघ आणि १६ सपोर्ट स्टाफ सदस्य गुरूवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले होते. BCCI ने भारतीय संघाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. पण, त्यात एकमेव महिला असलेल्या राजलक्ष्मी अरोरा ( Rajlaxmi Arora) हिची चर्चा रंगली आहे.

2 / 8

भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २३ ऑक्टोबरला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर अ गटातील उपविजेता ( २७ ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका ( ३० ऑक्टोबर), बांगलादेश ( २ नोव्हेंबर) व ब गटातील विजेता ( ६ नोव्हेंबर) अशा लढती खेळणार आहे. तत्पूर्वी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध सराव सामनेही खेळणार आहे.

3 / 8

भारताच्या १४ खेळाडूंसोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे, मसाजर अरुण कानडे, टीम व्हिडीओ अॅनालिस्ट हरी मोहन, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप, थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी, डॉक्टर चार्ल्स मिंझ, स्ट्रेंथ प्रशिक्षक सोहम देसाई आणि मानसोपचार तज्ज्ञ पॅडी अप्टन हेही आहेत.

4 / 8

त्याशिवाय मुख्य सायकोथेरपिस्ट कमलेश जैन, मीडिया मॅनेजर मौलिन पारिख, थ्रोडाऊन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्ने, सहाय्यक फिजिओ योगेश परमार आदीही आहेत. पण, राजलक्ष्मी अरोराची चर्चा अधिक आहे.

5 / 8

भारतीय संघासोबत ती प्रत्येक दौऱ्यावर असते आणि ती बीसीसीआय मीडियाची प्रोड्यूसर म्हणून काम पाहते. बीसीसीआयच्या वेबसाईटवर अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडीओची जबाबदारी तिच्याकडे आहे.

6 / 8

भारतीय खेळाडूंच्या मुलाखतीचे आयोजन करणे हे तिचं प्रमुख काम आहे. २०१९ मध्ये ती बीसीसीआयच्या सेक्स्युअर हरॅसमेंटच्या तक्रारींसाठी नेमलेल्या समितीत होती.

7 / 8

8 / 8

७ वर्षांपासून ती बीसीसीआयसोबत काम करतेय. याआधी तिने विविध वृत्तपत्र व चॅनेलमध्ये काम केले आहे. २०१२मध्ये तिने पुण्याच्या Symbiosis Institute Of Media And Communication मधून Activities and societies: Electronic journalismची पदवी घेतली.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App