Rishabh Pant Girlfriend Isha Negi Photos : ऋषभ पंतने 'गर्लफ्रेंड'ला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.. जाणून घ्या कोण आहे ईशा नेगी?

ऋषभ पंतने दोन वर्षांपूर्वी ईशाबरोबर फोटो पोस्ट करत जाहीरपणे दिली होती प्रेमाची कबुली

Rishabh Pant Girlfriend Isha Negi Photos : श्रीलंकेविरूद्धच्या टी२० मालिकेसाठी काल भारतीय संघाची घोषणा झाली. त्यात ऋषभ पंत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. पंतला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्यावर तो बायो-बबलमधून बाहेर पडला.

ऋषभ पंत आपल्या पर्सनल जीवनाबाबतच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो. पंत गेल्या काही वर्षांपासून ईशा नेगी हिला डेट करत आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त पंतने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो पोस्ट करत तिला खास शुभेच्छा दिल्या.

२०१९ या वर्षांच्या सुरुवातीला ऋषभ पंतने सोशल मीडियावर ईशा नेगीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या दरम्यान दोघेही सुट्टीवर होते. त्यानंतर पंतने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली.

ईशा नेगी ही मूळची उत्तराखंडमधील देहरादूनची आहे. ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. ईशा नेगी तिच्या ग्लॅमरस लूकसाठी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.

ईशा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा स्टायलिश फोटो शेअर करत असते. काही पोशाख पाश्चिमात्य असतात तर काही वेळा ती पारंपारिक पोशाखातही फोटो पोस्ट करते.

ईशा बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे. ईशाचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ ला देहरादूनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात झाला.

ईशा श्रीमंत राजपूत कुटुंबातून असून तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत. Fab X इंजिनिअरिंग असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे.

ईशाचे शालेय शिक्षण देहरादूनमधील एका कॉन्व्हेंट शाळेत तर नॉयडाच्या अमिटी महाविद्यालयातून ती कला शाखेची पदवीधर आहे.

पदवीचे शिक्षण झाल्यावर तिने इंटेरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं असून ती स्वत:देखील एक यशस्वी उद्योजिका आहे.

सर्व फोटो सौजन्य - ईशा नेगी Instagram