Join us  

मोठ्या कंपनीच्या मालकीणला पटवलं अन् आता IPL 2023 मध्येच सोडलं; पाहा ब्युटीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 4:23 PM

Open in App
1 / 8

दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू मिचेल मार्श लग्नासाठी ऑस्ट्रेलियाला परतला आहे. काही दिवसांनी तो भारतात परतेल आणि कॅपिटल्ससाठी आयपीएल खेळताना दिसेल.

2 / 8

तो गर्लफ्रेंड ग्रेटा मॅकसोबत लग्न करणार आहे. मार्शने दोन वर्षांपूर्वी मॅकशी साखरपुडा केला होता आणि अखेर आता तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

3 / 8

ग्रेटा मॅकने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे. तिला व्यवस्थापन क्षेत्रात खूप अनुभव आहे. तिने मॉन्टाना स्टेट युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्राम देखील पूर्ण केला आहे.

4 / 8

ग्रेटा मॅकने फेब्रुवारी ते मार्च २०१७ दरम्यान रमाडा इको बीच रिसॉर्टमध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न म्हणून करिअरची सुरुवात केली.

5 / 8

तिने नोव्हेंबर २०१२ ते एप्रिल २०१८ या कालावधीत रॉन मॅक मशीनरीमध्ये रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग समन्वयक म्हणून काम केले.

6 / 8

The Freedom Foundry Pte Ltd मध्ये समन्वयक आणि Eco Structures Australia Ltd येथे डिजिटल मार्केटिंग तज्ञ आणि ब्रँड मार्केटिंग व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. याशिवाय तिने डिसेंबर २०१८ ते डिसेंबर २०२० या कालावधीत इको बीच रिसॉर्टमध्ये डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणूनही काम केले आहे.

7 / 8

ग्रेटा मॅक द फार्म मार्गारेट रिव्हर कंपनीची सह-संचालक आहे. ती तिचा कौटुंबिक व्यवसाय चालवते.

8 / 8

जवळपास दोन वर्ष मॅक व स्टार्क यांनी एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्नाचा निर्णय घेतला. ११ सप्टेंबर २०२१ मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.

टॅग्स :आयपीएल २०२३क्रिकेट सट्टेबाजीदिल्ली कॅपिटल्स
Open in App