Join us  

मॉडल, अभिनेत्री, IPL चीअरगर्ल... मोहम्मद शमीच्या पत्नीबाबत जाणून घ्या सर्वकाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 12:31 PM

Open in App
1 / 12

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. कधी टिकटॉक व्हिडीओ, तर कधी न्यूड फोटोमुळे तिच्यावर नेटिझन्सकडून टीका होत आहे.

2 / 12

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा 6 जून 2014मध्ये उत्तर प्रदेश येथील मोरादाबाद येथे विवाह झाला. पण, चार वर्षांच्या संसारानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि जहाँनं थेट टीम इंडियाच्या गोलंदाजाविरुद्ध पोलीस चौकीत धाव घेतली.

3 / 12

हसीन जहाँनं भारतीय गोलंदाजासह त्याच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. पण, तिनं नुकताच शमीसोबत न्यूड फोटो पोस्ट करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

4 / 12

हसीन जहाँ ही अभिनेत्री आणि मॉडल होती. लग्नानंतर तिनं हे क्षेत्र सोडलं. त्यानंतर ती गृहिणी म्हणून रमली आणि नवीन पदार्थ तयार करण्याची आवड जोपासली. त्याशिवाय तिला भटकंती करायला आणि गाणं ऐकणं आवडतं

5 / 12

हसीनच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. कोलकाताच्या उद्योग क्षेत्रात मोहम्मद हसन हे मोठं नाव आहे.

6 / 12

हसीनचं शिक्षण कटवा भर्ती भवन येथे झालं. त्यानंतर तिनं कोलकाता युनिव्हर्सिटीतून पदवीचं अभ्यास पूर्ण केलं. मॉडलिंगची आवड असल्यामुळे तिनं या क्षेत्रात पाऊल ठेवलं.

7 / 12

पण, लग्नानंतर तिला मॉडलिंग सोडावी लागली. मोहम्मद शमीच्या वडिलांमुळे तिला हे क्षेत्र सोडावं लागलं. मोहम्मद शमीला पाठींबा द्यावा असा त्याच्या वडिलांचा आग्रह होता.

8 / 12

2012मध्ये मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांची पहिल्यांदा ओळख झाली. आयपीएलच्या एका कार्यक्रमात ही भेट झाली. तेव्हा हसीन जहाँ कोलकाता नाइट रायडर्सची चीअर लीडर होती.

9 / 12

त्यानंतर शमी आणि हसीन यांच्या भेटींचे सत्र वाढतच राहिले. मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. शमीला खेळताना पाहण्यासाठी ती स्टेडियममध्येही असायची. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिच्या उपस्थितीनं या प्रेमप्रकरणाबाबत सर्वांना माहित पडलं.

10 / 12

लग्नाच्या एका वर्षानंतर शमी व हसीन यांना एक मुलगी झाली. तिचं नाव आइराह शमी असं आहे.

11 / 12

मोहम्मद शमीशी लग्न करण्यापूर्वी हसीनचं एक लग्न आधीच झालं होतं. शेख सैफुद्दीन असं तिच्या पहिल्या पतीचं नाव आहे. 2002मध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि दोघांना दोन मुली होत्या.

12 / 12

मुलांना जन्म दिल्यनंतर हसीनला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं, परंतु तिला घरच्यांनी विरोध केला. त्यानंतर हे लग्न मोडलं. 2008मध्ये तिनं पहिल्या पतीला तलाख दिला.

टॅग्स :मोहम्मद शामीकोलकाता नाईट रायडर्स