Join us  

टीम इंडियाची Rising Star; क्रिकेटसाठी 'ती' बनली मुलगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 5:29 PM

Open in App
1 / 8

भारतीय महिला संघाने वन डे मालिका खिशात घातल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवातही धडाक्यात केली. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय महिलांनी 84 धावांनी विजय मिळवल पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

2 / 8

या सामन्यात 15 वर्षीय शेफाली वर्मानं 49 चेंडूंत 73 धावा केल्या. या कामगिरीसह तिनं महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या दीर्घकालीन विक्रम मोडण्याचा पराक्रम केला.

3 / 8

सचिननं 16 वर्ष व 213 दिवसांचा असताना कसोटीत पहिले अर्धशतक झळकावले होते. शेफालीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये रविवारी पहिले अर्धशतक झळकावले. तिनं 15 वर्ष व 285 दिवसांची असताना ही अर्धशतकी खेळी केली.

4 / 8

शेफालीचा क्रिकेटमधील प्रवास रंजक आहे. हरयानाच्या रोहतक येथे 28 जानेवारी 2004 मध्ये शेफालीचा जन्म झाला. त्यावेळी तेथे मुलींसाठी क्रिकेट अकादमी नव्हती आणि त्यामुळे तिला मुलांच्या क्रिकेट अकादमीत प्रवेश घ्यावा लागला. तिनं त्यासाठी स्वतःचा लूक मुलांसारखा केला.

5 / 8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 संघात शेफालीला संधी मिळाली. तेव्हा सर्वांच्या भूवया उंचावल्या. मिताली राजनं ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शेफालीची संघात एन्ट्री झाली

6 / 8

वयाच्या 10व्या वर्षी शेफालीनं क्रिकेटची बॅट हाती घेतली. तिचे वडील क्रिकेटचे चाहते आणि त्यामुळे त्यांनी शेफालीला प्रोत्साहन दिले.

7 / 8

रोहतक येथे सचिन तेंडुलकर त्याची शेवटची रणजी मॅच खेळला होता आणि त्याच्या खेळीनंतर शेफालीनं क्रिकेटपटू बनण्याचा निर्धार पक्का केला.

8 / 8

महिला ट्वेंटी-20 लीगमध्ये आपल्या खेळीनं शेफालीनं सर्वांचे लक्ष वेधलं. तिनं 31 चेंडूंत 34 धावा कुटल्या. त्यानंतर तिनं नागालँडविरुद्ध 56 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ति तिसरी सर्वोत्तम खेळी आहे.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआय