राहुल द्रविडला प्रशिक्षकपद का सोडावं लागलं, जाणून घ्या कारण...

सितांशू कोटक आणि पारस म्हाम्ब्रे यांच्याकडे कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद असणार आहे.

या दोघांकडे हे प्रशिक्षकपद काही महिन्यांसाठीच असणार आहे.

भारत A संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची नुकतीच निवड झाली आहे.

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारत A आणि 19 वर्षांखालील संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 2018चा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. या विश्वविजेत्या संघाला द्रविडने मार्गदर्शन केले होते.

या स्पर्धेतून भारताला शॉ, गिल, शिवम मावी, मनोज कार्ला, कमलेश नागरकोटी आदी उदयोन्मुख खेळाडू दिले.

द्रविडची नुकतीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रुमखपदी निवड झाली आहे आणि तेथे तो उदयोन्मुख खेळाडूंसह सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंबरोबर काम करणार आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कामातून द्रविडला प्रशिक्षकपद भूषवण्यासाठी जास्त वेळ मिळणार नाही. त्यामुळे द्रविडला प्रशिक्षकपद सोडावे लागले आहे.

द्रविड आता राष्ट्रीय अकादमीत भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी काम करणार आहे. कोटक भारत A आणि 19 वर्षांखालील संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपदही भूषवतील. त्याने 130 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 41.76च्या सरासरीनं 8061 धावा केल्या आहेत. माजी गोलंदाज म्हाम्ब्रेने दोन कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे.