Team India: टीम इंडियातील या फ्लॉप क्रिकेटपटूंच्या पत्नी आहेत खूपच हॉट, त्यांच्या अदा पाहून म्हणाल...

Indian Cricketers Wife: भारतीय संघातून खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. काही खेळाडूंना तशी संधीही मिळते. मात्र त्या संधीचा लाभ घेणं त्यांना शक्य होत नाही. यातील काही क्रिकेटपटूंना खराब कामगिरीमुले संघातून बाहेर करण्यात आले तर काही जणांना निवृत्ती जाहीर करावी लागली. या क्रिकेटपटूंची कारकीर्द तितकीशी प्रभावी नसली तरी त्यांच्या पत्नींच्या सौंदर्याची चर्चा मात्र कायम होत असते. आज आपण जाणून घेऊयात अशाच पाच क्रिकेटपटूंविषयी.

भारतीय संघातून खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. काही खेळाडूंना तशी संधीही मिळते. मात्र त्या संधीचा लाभ घेणं त्यांना शक्य होत नाही. यातील काही क्रिकेटपटूंना खराब कामगिरीमुले संघातून बाहेर करण्यात आले तर काही जणांना निवृत्ती जाहीर करावी लागली. या क्रिकेटपटूंची कारकीर्द तितकीशी प्रभावी नसली तरी त्यांच्या पत्नींच्या सौंदर्याची चर्चा मात्र कायम होत असते. आज आपण जाणून घेऊयात अशाच पाच क्रिकेटपटूंविषयी.

मनोज तिवारीची पत्नी सुश्मिता रॉयची गणना क्रिकेटपटूंच्या पत्नींमध्ये सर्वात सुंदर आणि हॉट म्हणून केला जातो. आपल्या स्टायलिश लूकमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र मनोज तिवारीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याल १२ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याची पत्नी श्रेयसी रुद्रा हीसुद्धा खूप सुंदर आहे. सौंदर्याची तुलना केली तर ती त्यामध्य बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देते. तिने इंजिनियरिंगची पदवी घेतली असून, ती एका एमएनसी कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. दुसरीकडे अशोक दिंडाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फारशी बहरली नाही. त्याने १३ वनडेत १२ बळी टिपले. त्यामुळे लवकरच त्याला संघातील आपले स्थान गमवावे लागले.

परविंदर अवानाचं लग्न एका पोलीस इन्स्पेक्टर तरुणीशी झालं होते. तिचं नाव संगीता कसाना आहे. मात्र परविंदर अवानाची टीम इंडियातील कारकीर्द औट घटकेची ठरली. तो दोन टी-२० सामन्यात खेळला. मात्र त्यात त्याला एकही बळी मिळवता आला नाही.

देशांतर्गत क्रिकेटमधील बलाढ्य संघ असलेल्या कर्नाटकला विनय कुमारने आपल्या नेतृत्वाखाली दोन वेळा विजेतेपद मिळून दिले आहे. विनय कुमार खूप साधा असला तरी त्याची पत्नी रिचा सिंह खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. रिचा बंगळुरूमधील इंटेग्रिटी स्पोर्ट कंपनीची डायरेक्टर आहे. तसेच तिला रायटिंग आणि फॅशन डिझायनरिंगचीही आवड आहे.

एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून स्टुअर्ट बिन्नीचा भारतीय संघामध्ये समावेश झाला होता. त्याला ६ कसोटी, १४ वनडे आणि ३ टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली मात्र स्टुअर्ट बिन्नीला या संधीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे भारतीय संघातून त्याची गच्छंती झाली. मात्र स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर खूप सुंदर आहे. तसेच ती स्पोर्ट्स अँकर म्हणून सामन्यांदरम्यान, क्रिकेटपटूंच्या मुलाखतीही घेत असते.