Cricket Buzz»फोटो गॅलरी »World Cup Final 2023: कांगारूंची 'शिकार' करण्यासाठी टीम इंडियाचे पाच 'बाण'; अचूक निशाणा साधणार!World Cup Final 2023: कांगारूंची 'शिकार' करण्यासाठी टीम इंडियाचे पाच 'बाण'; अचूक निशाणा साधणार! By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 2:25 PMOpen in App1 / 6अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये उद्या रविवारी वर्ल्ड कप फायनलचा थरार रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या कांगारुंना चितपट करण्यासाठी भारताला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारतासाठी ५ शस्त्र परिणामकारक ठरू शकतात.2 / 6रोहित शर्माची तडाखेबंद सुरुवात - यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माकडून सुरुवातीलाच होणारी फटकेबाजी भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरत आहे. पहिल्या १० षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीची हवा काढत रोहित शर्मा वेगाने धावा करत आहे. परिणामी समोरचा संघ दबावात येऊन कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. वर्ल्डकपमध्ये रोहितने १२४.१५ च्या स्ट्राइक रेटने ५५० धावा फटकावल्या आहेत. रोहितचा हाच फॉर्म फायनलमध्येही बघायला मिळाल्यास भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.3 / 6कोहलीची 'विराट' कामगिरी - भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा सध्या जादुई फॉर्मात आहे. कोहलीने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ७११ धावा केल्या असून अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात वनडे करियरमधील ५०वे शतक झळकावत विराटने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे. फायनलमध्येही विराटची बॅट तळपल्यास कांगारुंची पळता भुई थोडी होणार आहे.4 / 6कुलदीपच्या फिरकीची कमाल - ऑस्ट्रेलियाकडून ही वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली ती आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद २०१ धावांची वादळी खेळी करत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता. मात्र ग्लेन मॅक्सवेल हा फिरकीच्या जाळ्यात अडकत असल्याचं वर्ल्ड कपमध्ये अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे तो भारतासाठी घातक ठरण्याआधीच कुलदीप यादवला त्याला माघारी धाडावं लागणार आहे.5 / 6ऑस्ट्रेलियाचे ३ हुकमी एक्के लवकर बाद करण्याचं आव्हान - भारतासह ऑस्ट्रेलियाचे फलंदाजही यावेळीच्या वर्ल्ड कपमध्ये समोरच्या संघातील गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारा मिशेल मार्श दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे या तिकडीला लवकर बाद करत कांगारुंना अडचणीत आणण्याचं काम भारतीय गोलंदाजांना करावं लागेल.6 / 6शमी पुन्हा ठरणार गेमचेंजर - वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकल्यानंतर संघात पुनरागमन झालेल्या मोहम्मद शमीने अचूक मारा करत आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अंतिम सामन्यातही हीच कामगिरी कायम ठेवत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलण्याची संधी मोहम्मद शमीसमोर असणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications