Join us  

टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू मालामाल होणार; १२५ कोटींच्या बक्षिसातील कोणाच्या वाट्याला किती येणार? आकडे समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 4:06 PM

Open in App
1 / 11

यंदाच्या टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करत भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ७ धावांनी धूळ चारली आणि विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

2 / 11

२००७ नंतर भारताने पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकल्याने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर उतरत फटाक्यांची आतषबाजी करत हा विजय साजरा केला.

3 / 11

विश्वचषक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत असताना बक्षिसांचाही वर्षाव झाला. बीसीसीआयकडून भारतीय संघाला तब्बल १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.

4 / 11

मुंबईत झालेल्या व्हिक्टरी परेडवेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंकडे १२५ कोटी रुपयांचा चेक सुपूर्तही केला.

5 / 11

भारतीय संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ही रक्कम विभागून दिली जाईल, अशी माहिती जय शाह यांनी दिली होती.

6 / 11

टीम इंडियाला मिळालेल्या १२५ कोटी रुपयांच्या बक्षिसातील किती रक्कम कोणाला मिळणार, याबाबत चर्चा रंगत असताना आता इंडियन एक्स्प्रेसने एका वृत्तामध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

7 / 11

या वृत्तानुसार, संघातील १५ खेळाडूंना प्रत्येकी ५-५ कोटी रुपये दिले जातील. तसंच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही ५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

8 / 11

दुसरीकडे, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना प्रत्येकी अडीच कोटी रुपये दिले जाणार आहेत.

9 / 11

भारतीय संघासोबत तीन फिजियो, ३ थ्रो डाऊन स्पेशालिस्ट, २ मसाज थेरेपिस्ट आणि कंडिशनिंग कोच यांनाही प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

10 / 11

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय निवड समितीतील प्रत्येक सदस्याला १ कोटी रुपये मिळतील.

11 / 11

दरम्यान, भारतीय संघात रिंकू सिंह, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद या चार राखीव खेळाडूंनाही प्रत्येक १ कोटी रुपये मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

टॅग्स :विश्वचषक ट्वेन्टी-२०विराट कोहलीरोहित शर्माराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ