Join us  

PSL 2023 : ५१५ धावा, ३३ षटकार! ३६ चेंडूंत झळकले शतक, हॅटट्रिकची नोंद; एकच सामना अन् पाच Blockbuster Record

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 9:59 AM

Open in App
1 / 6

मुलतान सुलतान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्सने एकूण ५१५ धावा केल्या गेल्या आणि ज्या ट्वेंटी-२० सामन्यातील सर्वाधिक आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० चॅलेंजमध्ये टायटन्स आणि नाइट्स यांच्यातील सामन्यात एकूण ५०१ धावा झाल्या होत्या. टायटन्सने २७१ आणि नाइट्सने २३० धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना एखाद्या संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० धावांचा आकडा गाठल्याचे प्रथमच घडले होते. २०१६ मध्ये न्यूझीलंडच्या स्थानिक संघ सेंट्रल डिस्ट्रिक्टने ओटागोविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना २४८ धावा केल्या होत्या.

2 / 6

मोहम्मद रिझवान आणि उस्मान खानने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर मुलतान संघाला तुफानी सुरुवात करून दिली. उस्मान आणि रिझवान यांनी १० षटकांत १५७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान उस्मान खानने अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावले. पीएसएलच्या या इतिहासात कोणत्याही खेळाडूचे सर्वात वेगवान शतक ठरले. उस्मान खानने त्याच्याच संघातील खेळाडू रिले रोसूओचा विक्रम मोडीत काढला. त्याने एक दिवस आधी पेशावर जाल्मीविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले.

3 / 6

उस्मान खानने २७९.०७ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ४३ चेंडूत १२० धावा केल्या, ज्यात १२ चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश होता. मोहम्मद रिझवानने २९ चेंडूत ५५ धावा केल्या. रिझवानने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. नंतर टीम डेव्हिड (नाबाद ४३) आणि किरॉन पोलार्ड (नाबाद २३) यांनी मुलतानला विक्रमी २६२ धावांपर्यंत मजल मारली.

4 / 6

२६२ धावा ही पाकिस्तान सुपर लीगच्या इतिहासातील कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी पीएसएल सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इस्लामाबाद युनायटेडच्या नावावर होता. इस्लामाबाद संघाने २०२१ मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्ध दोन गडी गमावून २४७ धावा केल्या होत्या. या सामन्यात कैस अहमदने क्वेटाकडून चार षटकात एकूण ७७ धावा दिल्या, जी पीएसएलच्या इतिहासातील गोलंदाजाची सर्वात महागडी गोलंदाजी होती.

5 / 6

क्वेटा ग्लॅडिएट्सच्या डावाबद्दल बोलायचे तर ओमेर युसूफने सर्वाधिक ६७ आणि इफ्तिखार अहमदने ५३ धावा केल्या. मुलतान सुलतान्सकडून अब्बास आफ्रिदीने शानदार गोलंदाजी करत ४७ धावांत पाच बळी घेतले. यादरम्यान अब्बास आफ्रिदीनेही मोहम्मद नवाज, उम्मेद आसिफ आणि उमर अकमल यांना पायचीत करत हॅटट्रिक घेतली. मुलतान सुलतानच्या डावात १७ षटकार आणि क्वेटा ग्लॅडिएट्सच्या डावात १६ षटकार खेचले गेले.

6 / 6

PSL च्या 28 व्या सामन्यात हे रेकॉर्ड केले गेले: T20 सामन्यात सर्वाधिक धावा - 515 धावा (Quetta Gladiators + Multan Sultans) PSL सामन्यातील सर्वात महागडी गोलंदाजी - कैस अहमद (77 धावांत 2 विकेट) PSL ची सर्वोच्च धावसंख्या - 262 धावा (मुलतान सुल्तान्स) PSL मधील सर्वात वेगवान शतक - उस्मान खान (36 चेंडू) T20 मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या - 253 धावा (क्वेटा ग्लॅडिएटर्स)

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेट
Open in App