Join us  

World Test Championship : कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायचीय? ICC ने ठेवलं भारतासमोर आव्हानात्मक गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 10:51 AM

Open in App
1 / 10

पहिला - ऑस्ट्रेलिया - ७५ टक्के सध्याचे गुण, उर्वरित मालिका - दक्षिण आफ्रिका ( होम, ३ कसोटी), भारत ( अवे, ४ कसोटी), अंतिम संभाव्य टक्केवारी - ८४.२१% : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत विजय मिळवल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्य गुणतालिकेत आघाडीवर आहे. आता पुढील मालिकेत त्यांना घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सामना करायचा आहे. त्यानंतर पॅट कमिन्सचा संघ पुढील वर्षीच्या भारत दौऱ्यावर येणार आहे. २००४ पासून त्यांनी भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण, उर्वरित मालिकांमध्ये एक किंवा दोन विजय किंवा अनिर्णित निकाल त्यांना पहिल्या दोनमध्ये ठेवू शकतो.

2 / 10

दुसरा - दक्षिण आफ्रिका - ६० टक्के सध्याचे गुण, उर्वरित मालिका - ऑस्ट्रेलिया ( अवे, ३ कसोटी), वेस्ट इंडिज ( होम, २ कसोटी), अंतिम संभाव्य टक्केवारी- ७३.३३% : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ असा पराभव पत्करावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत अव्वल स्थान गमावले, तरीही पुढील वर्षीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ते मजबूत स्थितीत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील तीन मालिका जिंकल्याने इतिहास आफ्रिकेच्या बाजूने आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका दोन्ही संघांचे नशीब ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. या मालिकेत १ विजय आफ्रिकेला पुन्हा अव्वल स्थानावर आणेल आमि घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला पुढील वर्षी दोन कसोटी सामन्यांत पराभूत करून ते अंतिम स्थान निश्चित करू शकतात.

3 / 10

तिसरा - श्रीलंका - ५३.३३ टक्के सध्याचे गुण, उर्वरित मालिका - न्यूझिलंड ( अवे, २ कसोटी), अंतिम संभाव्य टक्केवारी - ६१.११% : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेची स्थिती चांगली दिसत असली तरी त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विजय अन् अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. श्रीलंकेसाठी फक्त एक मालिका उरली आहे, मार्चमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ते न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहेत. न्यूझीलंडमध्ये त्यांना १९ पैकी केवळ दोन कसोटी सामने जिंकता आले आहेत. पण, या मालिकेत त्यांनी विजय मिळवला तर त्यांची टक्केवारी ही ६१.११ इतकी होईल.

4 / 10

चौथा - भारत - ५२.०८ टक्के सध्याचे गुण, उर्वरित सामने - बांगलादेश ( अवे, २ कसोटी), ऑस्ट्रेलिया ( होम, ४ कसोटी), अंतिम संभाव्य टक्केवारी - ६८.०६ % : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ४०४ धावांचा डोंगर सर करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या बांगलादेशला त्यांनी १५० धावांत गुंडाळले. २५४ धावांची आघाडी घेत टीम इंडिया पुन्ह मैदानावर फलंदाजीला उतरली आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका २-० अशी जिंकून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार पैकी ३ सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या घरच्या मालिकेतील पराभवामुळे संभाव्य भारत/पाकिस्तानची अंतिम फेरी संपुष्टात आली आहे,ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका हे फायनलच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

5 / 10

पाचवा - इंग्लंड - ४४.४४ टक्के सध्याचे गुण, उर्वरित मालिका - पाकिस्तान ( १ कसोटी शिल्लक), अंतिम संभाव्य टक्केवारी - ४६.९७% : इंग्लंडने बाबर आजमच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले, पण त्यांना संधी आहे का? इंग्लंड फायनलच्या शर्यतीतून आधीच बाद झाला आहे. इंग्लंडने या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅशेस मालिका गमावली आणि तेथेच त्यांची कोंडी झाली.

6 / 10

सहावा - पाकिस्तान, ४२.४२ टक्के सध्याचे गुण, उर्वरित मालिका - इंग्लंड ( होम, १ कसोटी शिल्लक), न्यूझीलंड ( होम, दोन कसोटी), अंतिम संभाव्य टक्केवारी - ५४.७६% : पाकिस्तान आता सध्याच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे, त्यांची मोहीम इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी फसवली आहे. इंग्लंडविरुद्धचा तिसऱ्या सामन्यात विजय आणि न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप करूनही पाकिस्तान शर्यतीतून बाहेरच राहणार आहे.

7 / 10

सातवा - वेस्ट इंडिज, ४०.९१ टक्के सध्याचे गुण, उर्वरित मालिका - दक्षिण आफ्रिका ( अवे, २ कसोटी), अंतिम संभाव्य टक्केवारी - ५०% : वेस्ट इंडीजचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा २-० असा पराभव त्यांना महागात पडला.

8 / 10

आठवा - न्यूझीलंड, २५.९३ टक्के सध्याचे गुण, उर्वरित मालिका- पाकिस्तान ( अवे, २ कसोटी), श्रीलंका ( होम, २ कसोटी), अंतिम संभाव्य टक्केवारी - ४८.७२% : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे गतविजेते न्यूझीलंड यंदा अंतिम फेरीच्या शर्यतीतच नाही.

9 / 10

नववा - बांगलादेश, १३.३३ टक्के सध्याचे गुण, उर्वरित मालिका - भारत ( होम, २ कसोटी), अंतिम संभाव्य टक्केवारी - २७.७८ टक्के

10 / 10

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध बांगलादेशभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App