Cricket Buzz»फोटो गॅलरी »जगातला पहिला फलंदाज! मोहालीमध्ये रोहितने केले हे विक्रमजगातला पहिला फलंदाज! मोहालीमध्ये रोहितने केले हे विक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 7:29 PMOpen in App1 / 8मोहालीच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तब्बल तिसरं द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज बनला. त्याने 153 चेंडूंमध्ये 208 धावांची बरसात केली.2 / 8 एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध दोन द्विशतके फटकावणारा एकमेव फलंदाज.2013 मध्ये रोहित शर्माने कांगारुंविरुद्ध कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांची खेळी साकारली होती. 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार खेळी केली होती. रोहित शर्माने 264 धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धची ही खेळी रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे. 3 / 8एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावणारा दुसरा कर्णधार, याआधी वीरेंद्र सेहवागने अशी कामगिरी केली होती. 4 / 8एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 वेळा दीडशेहून अधिक धावा फटकावण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी रोहित शर्माची बरोबरी.5 / 8 रोहितची एकदिवसीय क्रिकेटमधील षटकारांची संख्या 158 वर त्याबरोबरच महेंद्र सिंग धोनी (213), सचिन तेंडुलकर (195), सौरव गांगुली (190) यांच्यानंतर वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर.6 / 8आजच्या खेळीत रोहितने 13 चौकार 12 षटकारांची आतिषबाजी केली. रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा 115 चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या 36 चेंडूत पूर्ण केल्या. 7 / 8आजच रोहितच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने सामन्याला रोहित शर्माची बायको रितीकाही उपस्थित होती. या सामन्यात 40 व्या षटकात एक धाव घेत रोहितने आपल्या कारकिर्दितील 16वं शतक पूर्ण केलं. कर्णधार म्हणून रोहितचं हे पहिलं शतक ठरलं. शतक पूर्ण होताच रितीकाने टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं तर रोहितने भरमैदानातून फ्लाइंग किस देऊन आपलं प्रेम व्यक्त केलं.8 / 8त्यानंतर द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना रितीका भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित 190 धावांवर खेळत असताना जास्त फलंदाजीची संधी धोनीकडे होती. पण अखेरच्या षटकांमध्ये रोहितकडे स्ट्राइक आल्यावर रितीकाच्या चेह-यावरची बेचैनी स्पष्ट दिसत होती. रोहित जस-जसा द्विशतकाच्या जवळ पोहोचत होता रितीकाच्या चेह-यावरील हावभाव बदलत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. अखेर रोहित शर्माने द्विशतक पूर्ण केलं आणि रितीकाला आनंदाश्रू अनावर झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications