Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारतीय क्रिकेटपटूसह 'डेट'वर जायला सुंदरी तयार, पण ठेवली एक अट...भारतीय क्रिकेटपटूसह 'डेट'वर जायला सुंदरी तयार, पण ठेवली एक अट... By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 10:45 AMOpen in App1 / 10कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. अशात क्रीडा स्पर्धा कधी चालू होतील, हे आताच सांगणे अवघड आहे.2 / 10अशात क्रीडापटू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी आणि चाहत्यांशी संवाद साधत आहेत. 3 / 10अशाच एका व्हिडीओ चॅट दरम्यान भारताचा सलामीवीर मुरली विजयनं एका सुंदरीसोबत डिनर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.4 / 10व्हिडीओ चॅटींग करताना मुरलीनं दोन खेळाडूंसोबत डिनरला जायला आवडेल, असं मत व्यक्त केलं. या दोन व्यक्तिंमध्ये एलिसा पेरी आणि शिखर धवन यांचा समावेश आहे.5 / 10एलिसा पेरीबद्दल तो म्हणाला,''एलिसा सुंदर आहे, तिच्यासोबत मला डिनरला जायला आवडेल.''6 / 10त्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूनं उत्तर दिलं. तिनं मुरलीसोबत डिनर डेटवर जाण्यास होकार दिला, परंतु एक अट ठेवली.7 / 10एलिसा म्हणाली,''मी डिनर डेटवर जायला तयार आहे, फक्त बिल मुरलीनं भरायला हवं. त्यानं केलेल्या कौतुकावर मी फिदा झाली.''8 / 10ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयी महिला संघाची ती सदस्य आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 120 सामन्यांत तिच्या नावावर 1218 धावा आणि 114 विकेट्स आहेत.9 / 10वन डे क्रिकेटमध्येही तिची सरासरी 52.10 इतकी आहे. तिनं 112 वन डे सामन्यांत 3022 धावा केल्या आहेत, तर 152 विकेट्स घेतल्या आहेत.10 / 10पेरीनं 8 कसोटी सामन्यांत द्विशतकासह ( 213*) 78च्या सरासरीनं 624 धावा केल्या आहेत, तर 31 विकेट्सही घेतल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications