Join us  

Hardik Pandya : हार्दिक पांड्याचाच बोलबाला, ‘या’ दिग्गज खेळाडूनं केली टीम इंडियाचा कर्णधार बनवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 9:05 AM

Open in App
1 / 7

Hardik Pandya: IPL 2022 मध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सच्या विजयाचा नायक ठरला. कर्णधारपदासोबतच हार्दिकने जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी करत आपली छाप सोडली.

2 / 7

या सीजनमध्ये हार्दिकचा फॉर्मही उत्तम होता. अंतिम सामन्यात हार्दिकनं प्रथम तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर ३० चेंडूत ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून संघाला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून दिले.

3 / 7

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वानंही सर्वांना प्रभावित केलं. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनही पांड्याच्या नेतृत्वानं प्रभावित झाला आहे. आगामी काळात हार्दिकला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्याचं मोठं वक्तव्य त्यानं केलं.

4 / 7

“नवीन फ्रँचायझीची अप्रतिम कामगिरी. भारताला दोन वर्षांत कर्णधाराची निवड करायची असेल तर तो हार्दिक पांड्याला पाठिंबा देईन. वेल डन गुजरात,” असं ट्वीट त्यानं केलं आहे.

5 / 7

हार्दिकने आयपीएल २०२२ मध्ये १५ सामन्यांमध्ये ४४.२७ च्या सरासरीने ४८७ धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. हार्दिकने या मोसमात गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या. हार्दिकने गोलंदाजीतही कमाल दाखवत २७.७५ च्या सरासरीने एकूण आठ विकेट घेतल्या. हार्दिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही संघात स्थान मिळाले आहे.

6 / 7

दुसरीकडे, गुजरात टायटन्सने त्यांचा पहिला आयपीएल ट्रॉफी विजय खास पद्धतीने साजरा केला. संघाच्या खेळाडूंनी अहमदाबादमध्ये रोड शो करून त्यांच्या चाहत्यांचे आणि समर्थनाचे आभार मानले. हा रोड शो उस्मानपुरा रिव्हरफ्रंट येथून सुरू होऊन विश्वकुंज रिव्हरफ्रंट येथे संपला.

7 / 7

टॅग्स :हार्दिक पांड्याआयपीएल २०२२इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ
Open in App