Cricket Buzz»फोटो गॅलरी »WPL 2024 Points Table: दिल्लीची गाडी सुसाट! MI आणि RCB मध्ये स्पर्धा; गुजरातच्या खात्यात भोपळाWPL 2024 Points Table: दिल्लीची गाडी सुसाट! MI आणि RCB मध्ये स्पर्धा; गुजरातच्या खात्यात भोपळा By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 3:39 PMOpen in App1 / 10महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम अंतिम टप्प्याकडे कूच करत आहे. आताच्या घडीला मागील हंगामातील गतविजेता दिल्ली कॅपिटल्सचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान आहे. मंगळवारी स्पर्धेतील बारावा सामना खेळवला. दिल्ली कॅपिटल्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून क्रमवारीत चांगली झेप घेतली.2 / 10दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा २९ धावांनी पराभव केला. या सामन्यात कर्णधार मेग लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी चमकदार कामगिरी केली. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.3 / 10तर मुंबई इंडियन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीने आतापर्यंत ५ सामने खेळले असून ४ जिंकले आहेत. गुजरात जायंट्स सर्वात खालच्या स्थानावर असून त्यांनी अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. 4 / 10आताच्या घडीला क्रमवारीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे वर्चस्व आहे. दिल्ली कॅपिटल्सला एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांचे ८ गुण आहेत.5 / 10रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ५ सामन्यातील ३ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीला २ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीचे ६ गुण आहेत.6 / 10हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ सामने खेळले असून ३ जिंकले आहेत. गतविजेत्यांना २ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचेही ६ गुण आहेत पण त्यांचा नेट रन रेट RCB पेक्षा कमी आहे. याच कारणामुळे मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. 7 / 10दरम्यान, यूपी वॉरियर्स २ विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे, यूपीचे ४ गुण आहेत. क्रमवारीत सर्वात तळाला गुजरात जायंट्सचा संघ आहे. त्यांनी ४ सामने खेळले असून अद्याप एकही सामना जिंकला नाही. सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.8 / 10दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ४ बाद १९२ धावा केल्या. यादरम्यान कर्णधार मेग लॅनिंगने ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. तिने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने स्फोटक खेळी केली.9 / 10याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने ३३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. तिच्या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दिल्लीकडून जेमिमा रॉड्रिग्जने मॅचविनिंग खेळी केली. तिने ३३ चेंडूत ६९ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 10 / 10दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला केवळ १६३ धावा करता आल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत मुंबईचा २९ धावांनी पराभव केला. आणखी वाचा Subscribe to Notifications