WPL 2025 Auction साठी MI अन् RCB सह कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

महिला प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामाआधी बंगळुरुमध्ये पार पडणार मिनी लिलाव

आयपीएल मेगा लिलावानंतर आता महिला प्रीमिअर लीगच्या मिनी लिलावासंदर्भातील माहिती समोर आली आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, १५ डिसेंबरला महिला प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामाआधी बंगळुरुमध्ये मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याचे समजते. बीसीसीआयने अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.

मिनी लिलावाआधी पाच फ्रँचायझी संघांनी एकूण ७१ महिला खेळाडूंना रिटेन केले आहे. यात २५ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

मिनी लिलावात गुजरात जाएंट्स संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक ४.४ कोटी रुपये असतील. या शिल्लक रक्कमेसह ते ४ खेळाडूंची जागा भरून काढण्यासाठी लिलावात सहभागी होतील.

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ ४ स्लॉट भरण्यासाठी रिंगणात उतरेल. यासाठी त्यांच्या पर्समध्ये ३ कोटी २५ लाख रुपये शिल्लक आहेत.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाकटे ४ स्लॉट भरण्यासाठी २ कोटी ६५ लाख एवढी रक्कम आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा महिला संघ २ कोटी ५० लाख पर्ससह ४ चा आपला स्लॉट भरण्यासाठी मिनी लिलावाच्या रिंगणात उतरेल.

यूपी वॉरियर्ज संघ ३ कोटी ९० लाख रुपयांच्या पर्ससह ३ जागा भरण्यासाठी मिनी लिलावात उतरेल.